Join us

अमेय ही करणार व्हाइट रॅबिट रेड रॅबिट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 13:54 IST

सध्या कलाकारांमध्ये व्हाइट रॅबिट रेड रॅबिट नाटक करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. या नाटकाला दिग्दर्शकच नसतो. या नाटक करताना ...

सध्या कलाकारांमध्ये व्हाइट रॅबिट रेड रॅबिट नाटक करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. या नाटकाला दिग्दर्शकच नसतो. या नाटक करताना प्रत्यक्ष रंगभूमीवर कलाकाराला स्क्रीप्ट मिळत असते. त्यामुळे ती स्क्रीप्ट वाचून कलाकाराला ते नाटक सादर करायचे असते. त्याचप्रमाणे या नाटकाला दिग्दर्शक ही नसतो. त्यामुळे हे नाटक करणे कलाकारासाठी खूप मोठे आव्हान असते. म्हणूनच सध्या हे आव्हान मराठी कलाकार पार पाडताना दिसत आहेत. मुक्ता, आलोकनंतर आता अमेय वाघदेखील व्हाइट रॅबिट रेड रॅबिट हे नाटक करणार असल्याचे समजत आहे. अमेय हा दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेनंतर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. यानंतर त्याने अमर फोटो स्टुडियो या नाटकमधूनदेखील प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. तसेच कास्टिंग काउच या वेबसीरीजच्या माध्यमातून देखील तो प्रेक्षकांचा लाडका बनला. नुकताच त्याचा घंटा हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. आता तो सध्या महेश मांजरेकर यांच्या चित्रपटामध्ये व्यग्र असल्याचे कळत आहे. त्याचबरोबर तो त्याच्या पहिल्या हिंदी वेबसीरीजसाठी देखील सज्ज झाला आहे. मालिका, नाटक, चित्रपट, वेबसीरीज पाहता अमेयची गाडी सुसाटच निघाली असल्याचे पाहायला मिळत आहे.