Join us

कोणता तेलुगू चित्रपट करतेय पल्लवी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 12:56 IST

अभिनेत्री पल्लवी सुभाषने अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये तसचे जाहिरातींमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली ...

अभिनेत्री पल्लवी सुभाषने अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये तसचे जाहिरातींमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा पल्लवीने नेहमीच दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. स्वत:च्या वेगळ्या अभिनयाची मोहोर तिने चित्रपटसृष्टीत उमटविली आहे.त्याचबरोबर पल्लवीने साऊथ चित्रपटसृष्टीत देखील याआधी काम केले होते. पल्लवीच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पल्लवी तेलुगू भाषेतील एका सिनेमात प्रेक्षकांना दिसणार आहे. आयुषमान खुरानाचा विकी डोनर हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. याच चित्रपटाचा रिमेक तेलुगू भाषेत करण्यात आला आहे. यारिमेकमध्ये पल्लवीने प्रमुख भूमिका साकारली आहे.याआधी पल्लवीने साऊथ चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तेलुगू चित्रपट करण्याची पल्लवीची ही पहिलीच वेळ आहे. साऊथ मधील इतर भाषांच्या तुलनेत तेलुगू भाषा बोलायला थोडी अवघड आहे. परंतु अभिनय करायचा म्हटल्यावर कलाकाराला भाषेचेही बंधन नसते हेच खरे आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी साऊथमध्ये कामे केली आहेत.                                 आता पल्लवी देखील तेलगु चित्रपटातून तिच्या अभिनयाची जादू दाखवण्यास सज्ज झाला आहे. नरुडा डोनरुडा असे या तेलगु चित्रपटाचे नाव आहे. हिंदीमधील विकी डोनर या चित्रपटात आपल्याला आयुषमान आणि यामीची जोडी पाहायला मिळाली होती. या चित्रपटातील गाणी देखील चांगलीच लोकप्रिय झाली होती. आता पल्लवी तेलगु विकी डोनरमध्ये काय कमाल करतेय हे आपल्याला लवकरच समजेल.