प्रत्येकाच्या आ़युष्यात एक खास क्षण असतो. तो क्षण ती व्यक्ती आपण कधीच विसरू शकत नाही. तो क्षण जर आपल्या खास व्यक्तीसोबतचा असेल तर आपण सातवे आँसमानवरच पोहोचतो. सध्या असेच काहीतरी घडलेय अभिनेता पुष्कर जोग याच्यासोबत. आपल्या या अविस्मरणीय क्षणाविषयी अभिनेता पुष्कर जोग लोकमतला सीएनएक्सला सांगतो, ''मला लहानपणापासून डान्स करण्याची खूप आवड आहे. त्यामुळे डान्स करणे हे माझे ध्येयच आहे.'' सध्या पुष्कर रोमो डिसोजाच्या एका डान्स कॉन्स्टर्टचा भाग असल्याने त्याला खूप आनंद झालाय असे पुष्कर सांगतो. त्याच्या या कॉन्स्टर्टमध्ये घाटी ट्रान्स या गाण्यावर पुष्करचे पाय थिरकले आहेत. त्यामुळे हा कॉन्स्टर्ट माझ्यासाठी खरेच अविस्मरणीय आहे. तसेच रेमोकडून मला खूप काही शिकायला मिळाले. तसेच एक व्यक्ती म्हणून तो खूप मदतशीलदेखील आहे. रेमोसोबत काम केल्यामुळे माझ्यातला आत्मविश्वास वाढला आहे. त्याचसोबत हा कॉन्सर्ट करताना खूप मजा आणि धमाल केली आहे. पुष्करने यापूर्वी अनेक बॉलिवूड आणि मराठी चित्रपट केले आहेत. तसेच तो प्रेक्षकांना काही मालिकांमध्ये देखील पाहायला मिळाला होता. सध्या तो दाक्षिणात्य चित्रपट करण्यास सज्ज झाला आहे.
पुष्करच्या आयुष्यातला आनंदाचा 'तो' क्षण कोणता ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 17:25 IST