Join us

​मराठी सेलिब्रिटींचे हे फाफे प्रकरण काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:45 IST

​मराठी सेलिब्रिटी फ बाराखडीचा एक व्हिडिओ सोशल नेटवर्किंगला पोस्ट करून त्याच्यासोबत फाफे हा हॅशटॅग देत आहेत. त्यामुळे हे फाफे प्रकरण काय आहे हेच सर्वसामान्य लोकांना कळत नाहीये.

गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी सेलिब्रिटी फची बाराखडी म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सेलिब्रिटींच्या या व्हिओमागे काय दडलंय हेच सामान्य लोकांना कळत नाहीये.फाफेचा हा व्हिडिओ अभिनेता अभिनय बेर्डे, प्राजक्ता माळी, स्पृहा जोशी, रोहित हल्दिकर तसेच मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट केला आहे. गिरिजा ओकच्या या व्हिडिओत तर आपल्याला तिचा मुलगादेखील पाहायला मिळत आहे. गिरिजाने हा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून १५ हजाराहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी या व्हिडिओला सोशल नेटवर्किंग साइटवर लाइक केले आहे. या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कलाकार हा व्हिडिओ पोस्ट करताना फाफे हा हॅशटॅग देत आहे. त्यामुळे हे फाफे प्रकरण काय आहे हेच सर्वसामान्य लोकांना कळत नाहीये. Also Read : कोणत्या चित्रपटाच्या माध्यमातून विवेक करतोय मराठीत पदार्पण ?फाफे या नावाने कोणता चित्रपट अथवा नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे का असा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. तर हे फाफे प्रकरण काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सगळे मराठी सेलिब्रिटी मिळून एका चित्रपटाचे प्रमोशन करत असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा व्हिडिओ ते पोस्ट करत आहे. हा चित्रपट म्हणजे फास्टर फेणे असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच फाफे या हॅशटॅगचा धुमाकूळ घालण्यात आला आहे. फास्टर फेणे या चित्रपटात प्रेक्षकांना दिल दोस्ती दुनियादारी फेम अमेय वाघ, पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओची असणार आहे. तसेच रितेश देशमुखदेखील या चित्रपटाचा निर्माता आहे.