Join us

ती सध्या काय करते ६ जानेवारीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 13:26 IST

काही दिवसांपासून ती सध्या काय करते या चित्रपटाची चर्चा रंगत आहे. या चित्रपटाचे प्रोमोदेखील सोशलमीडियावर मोठया प्रमाणात पसंतीस उतरताना ...

काही दिवसांपासून ती सध्या काय करते या चित्रपटाची चर्चा रंगत आहे. या चित्रपटाचे प्रोमोदेखील सोशलमीडियावर मोठया प्रमाणात पसंतीस उतरताना दिसत आहे. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे झळकणार असल्याने या चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे. मात्र आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. फायनली हा चित्रपट सहा जानेवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनयसोबत गायिका आर्या आंबेकरदेखील झळकणार आहे. आर्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. अशी ही हटके जोडी प्रेक्षकांना ती सध्या काय करते या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना आणखी एक सरप्राईज म्हणजे या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधानदेखील झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाचे खास गिफ्ट असणार आहे. हा चित्रपट सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अंकुश आणि तेजश्रीची हटकी जोडीदेखील दिसणार आहे. तेजश्री प्रधान ही होणार सून मी हया घरची या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. तसेच तिने शर्यत, झेंडा, लग्न पाहावे करून असे अनेक चित्रपटदेखील केले आहेत. ती सध्या अभिनेता शर्मन जोशीसोबत मैं और तुम हे हिंदी नाटक करत आहे. तर अंकुश चौधरी याने मराठी चित्रपटसृष्ट्रीला दगडी चाळ, क्लासमेट, दुनियादारी, गुरू, डबलसीट, शहाणपण दे ग देवा असे एक से एक सुपरहीट चित्रपट दिले आहेत.