Join us  

जाणून घ्या जेव्हा आस्ताद काळेला राग येतो तेव्हा तो काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2017 11:11 AM

प्रत्येकाची राग काढण्याची स्टाईल असते. कुणी मारुन तर कुणी ओरडून आपला राग व्यक्त करतो. सामान्य व्यक्ती असो किंवा मग ...

प्रत्येकाची राग काढण्याची स्टाईल असते. कुणी मारुन तर कुणी ओरडून आपला राग व्यक्त करतो. सामान्य व्यक्ती असो किंवा मग सेलिब्रिटी प्रत्येकालाच राग येतोच. मात्र व्यक्तीनुसार राग व्यक्त करण्याच्या त-हा बदलत असतात. अभिनेता आस्ताद काळे याचीही राग व्यक्त करण्याची पद्धत आहे. आस्तादला राग अनावर झाला की तो सरळ त्या व्यक्तीला बदडतो. खुद्द आस्तादने ही बाब सीएनएक्स लोकमतशी शेअर केली आहे. पुण्यातील ज्ञानेश्वर चौकाजवळ एक वळणं आहे. त्या वळणावर एक रिक्षास्टँड आहे. त्या वळणावर एक रिक्षावाला सकाळच्या वेळी कायम उभा राहायचा.गर्दीच्या वेळी तो तिथे उभा राहत असल्याने अनेकांना त्रास व्हायचा. ही बाब आस्तादच्या लक्षात आली आणि त्यानं रिक्षावाल्याला समज दिली. मात्र त्या रिक्षावाल्याच्या वागण्यात काहीही बदल झाला नाही. एके दिवशी येणा-या जाणा-यांना होणारा त्रास पाहून आस्तादचा पारा यामुळं आणखीच चढला. त्याने रागाच्या भरात त्याचा रिक्षा आपल्या हाताने पुढे ढकलला. हे पाहून रिक्षावालाही चिडला. त्यानं आस्तादशी वादावादी सुरु केली आणि दोघांमध्ये हाणामारी झाली. इतका मार खाऊनही तो रिक्षावाला काही सुधारला नाही. यानंतर सलग तीन दिवस आस्तादने रिक्षावाल्याला मारलं. मात्र चौथ्या दिवशी राग अनावर झाल्याने आस्तादने त्याला रक्त येईपर्यंत मारलं. त्यामुळे रिक्षावाल्यांबाबत आस्तादच्या मनात प्रचंड राग आहे. आय हेट रिक्षावाले असंही त्याने सांगितले. आस्तादच्या अशा वागण्याने कॉलेजमध्ये असताना त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल झाला होता. इतकंच नाही तर त्याला जेलची हवासुद्धा खायला लागली होती. मात्र आता रिक्षावाल्यांना बदडण्यासोबतच त्यांच्या रिक्षाचं नुकसान तो करतो. रिक्षावाले ऐकत नसतील तर त्यांच्या नादाला न लागता थेट वाहनाचं नुकसान करायचं अशा रितीने आस्ताद आपला राग व्यक्त करतो.सध्या आस्ताद काळे 'सरस्वती' मालिकेत राघव ही भूमिका साकारत आहे. मालिकेतली  त्याची ही भूमिका पाहून रसिकांनाही त्याचा प्रचंड राग येत असावा.रसिकांकडून अशा प्रतिक्रिया मिळणे म्हणजेच ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरते असेच म्हणावे लागेल. Also Read:मराठी मालिकांमध्ये कथा ही सगळ्यात महत्त्वाचीः आस्ताद काळे