Join us  

काय सांगता Anushka Sharma ने केली Reena Aggarwal ची कॉपी, सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 9:19 AM

वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांचा ‘सुई धागा’ हा हिंदी सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. खरं तर प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला. मग ते कारण गंभीर असो किंवा मजेशीर... असो! या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनापासून सुरु झालेला अनुष्काच्या ‘ममता मिम्सचा सिलसिला’ हा प्रमोशनपर्यंत चालू होता. 

सोशल मिडीयावर अशा चर्चांना उधाण आलंय की ‘जर अनुष्का शर्मा धागा आहे तर रीना अगरवाल सुई आहे’. हे थोडे मजेशीर वाटत असला तरी अशा चर्चा आता सोशल मीडियावर रंगत आहेत. याला कारणीभूत ठरला आहे तो म्हणजे रिनाचा हा फोटो. ‘#AnushkaCopiedReena’,‘अनुष्काने रीनाच्या लूकची कॉपी केली आहे’, ‘साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांनंतर बॉलिवूड आता मराठी चित्रपटांची पण कॉपी करत आहेत’ वैगरे वैगरे. असा ‘बोभाटा’ का बरं झाला असेल?

 

वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांचा ‘सुई धागा’ हा हिंदी सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. खरं तर प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला. मग ते कारण गंभीर असो किंवा मजेशीर... असो! या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनापासून सुरु झालेला अनुष्काच्या ‘ममता मिम्सचा सिलसिला’ हा प्रमोशनपर्यंत चालू होता. 

अनुष्काच्या मिम्सचे प्रकरण आता कुठे थंडावले असताना ऐन प्रदर्शनाच्या दिवशीच अनुष्काच्या ममता भूमिकेशी संबंधित सोशल मिडीयावर आणखी एक खळबळ उडाली. याचा अर्थ असा की या चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. आता अशी चर्चा चालू आहे की अनुष्काने चक्क मराठी आणि हिंदी अभिनेत्री रीना अगरवालच्या ‘झाला बोभाटा’ या मराठी चित्रपटातील रीनाचा लूक कॉपी केला आहे. 

 आपल्या कामाची जेव्हा नक्कल होते तेव्हा ती आपल्या कामाची पोचपावतीच समजायची. अनुष्काने कॉपी केलेल्या लूकमुळे रीना अगरवालच्या कमाल अभिनयाने परिपूर्ण असलेला ‘झाला बोभाटा’चा लूक आणि एकंदरीत मराठी चित्रपटाचे कौतुक होतंय हे नक्की.

सध्या सर्वांनाच फिट राहायला आवडतं; फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर फिट राहणे हे ओघाने आलेच त्यामुळे कलाकार "डाएट डे प्लॅन" बनवतात.मराठी सिनेसृष्टीदेखील कलाकार आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही.अनेक कलाकार सोशल मीडियावर आपल्या फॅन्स ना डाएट आणि जिम बद्दल योग्य ते मार्गदर्शन करताना दिसतात.

आपल्या फॅन्सना प्रत्येक गोष्टीची अपडेट्स देण्यासाठी नेहमीच आपल्या सोशल मीडिया वर 'अक्टिव्ह' राहत असतात,कधी एखादी पोस्ट शेयर करत तर कधी 'लाईव्ह' येऊन त्यांच्या फॅन्सना त्यांच्या "डे- टुडे" गोष्टीबद्दल माहिती देत असतात. मराठी सिनेजगात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री रीना अगरवाल अशाच प्रकारे आपल्या सोशल मीडियावर फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत फिटनेसच्या टीप्स देत असते.

टॅग्स :अनुष्का शर्मासुई-धागा