Join us

का आले भाऊ कदम याच्या डोळयात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 13:14 IST

कलाकारांच्या चाहत्यांविषयी आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी चाहते किती उत्सुक असतात हे सर्वानाचा माहित आहे. ...

कलाकारांच्या चाहत्यांविषयी आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी चाहते किती उत्सुक असतात हे सर्वानाचा माहित आहे. आपला आवडता कलाकार दिसला की, त्याला भेटण्यासाठी, हात मिळविण्यासाठी चाहते जीवाची ही पर्वा करत नाहीत. अशातच आपला फेव्हरेट कलाकार समोर दिसला की, चाहत्यांच्या आनंदाला चार चाँद लागतात.        आता हेच पाहा ना, प्रेक्षकांना खळखळून हसविणारा अभिनेता भाऊ कदम यांचेदेखील असंख्य चाहते आहेत. त्यांना भेटण्यासाठी चाहते अनेक प्रयत्न करत असतात. अशा आपल्या क्रेझी फॅनविषयी अभिनेता भाऊ कदम लोकमत सीएनएक्सला सांगतात, एका ठिकाणी आम्ही सर्वजण गेलो होतो.  तिथे एक महिला भेटली. मला पाहताक्षणीच ती इतकी भारावून गेली होती की, तिच्या डोळयातून पाणी आलं होतं. इतकेच नाही तर ती माझ्या पायादेखील पडत होती. तिचे हे प्रेम पाहता, आजूबाजूवाले म्हणाले एक फोटो काढू, त्यावेळी ती म्हणाली, फोटो नको भाऊ दिसले हेच खूप झाले. चाहत्यांचे असे प्रेम पाहता खरचं अश्रूदेखील अनावर होतात.        असाच एकदा आणखी एका चाहत्याचा फोन आला होता. तो म्हणत होता, माझे बाबा खूपच आजारी आहेत. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. यासाठी तुम्हाला मानधनदेखील दिले जाईल. बापरे, किती हे प्रेम. ऐकून मी हे थक्कच झालो. खरचं आमच्या कलाकारांसाठी चाहत्यांचे प्रेम खूपच महत्वाचे असते. कारण शेवटी चाहते आहेत, तर आम्ही कलाकार आहोत. शेवटी कलाकारांचे हे प्रेमच आमच्या कामाच्या यशाची पावती असते. भाऊ कदम हे चला हवा येऊ दया या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहे. त्यांचा नुकताच झाला बोभाटा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यांचा हा चित्रपटदेखील मोठया प्रमाणावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.