Join us  

विठ्ठल मिसिंग ?.... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2017 5:28 AM

या व्हिओचं वारीमधील छायाचित्रण स्वप्नील पवार याने केले आहे. मकरंद सावंत, समीर खांडेकर, पल्लवी अजय पाटील, माधुरी गवळी, मंदार मांडवकर, तुषार घाडीगावकर, कृणाल राणे यासह विविध कलाकारांच्या अभिनयाची झलक या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

सावळ्या पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने लाखो वारकरी आषाढी वारीला जातात. ऊन, वारा किंवा प्रसंगी पाऊस याची तमा न बाळगता वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. मजल दरमजल करत खडतर प्रवास वारक-यांचा सुरु असतो. मनात फक्त एकच इच्छा असते ती म्हणजे आपल्या लाडक्या विठूरायाचं दर्शन व्हावं आणि त्याची भेट व्हावी ही भक्तांची इच्छा असते. देवाला भेटण्याची, त्याला पाहण्याची प्रत्येक माणसाची इच्छा असते.आषाढी एकादशीला पंढरपुरात भक्तांचा जणू काही पूर आलेला असतो. प्रत्येकाच्या मनी फक्त एकच ध्सास आणि एकच आस असते ती म्हणजे विठ्ठल भेटीची.मात्र ज्याच्या दर्शनासाठी भक्तांना ओढ लागलेली असते तो विठ्ठल हरवला तर.. तो विठ्ठल मिसिंग झाला तर... हीच संकल्पना मांडणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान हिट ठरत आहे. हा विठ्ठल तुझ्याच देही, तू ओळखलास नाही... तू शोध तुझ्यातच विठ्ठल... तुझा विठ्ठल मिसिंग नाही... असं म्हणत हरहुन्नरी कलाकार मकरंद सावंत, पराग सावंत, तुषार घाडीगावकर या डिजीटल युगातल्या काही भक्त मंडळींनी हरवलेल्या विठ्ठलाला शोधण्याचा प्रयत्न केलाय. केवल वाळंज या गायकानं हे गाणं गायलंय. या व्हिओचं वारीमधील छायाचित्रण स्वप्नील पवार याने केले आहे. मकरंद सावंत, समीर खांडेकर, पल्लवी अजय पाटील, माधुरी गवळी, मंदार मांडवकर, तुषार घाडीगावकर, कृणाल राणे यासह विविध कलाकारांच्या अभिनयाची झलक या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.