Join us

​'बॉईज' या चित्रपटाच्या टीमने दिली लोकमत ऑफिसला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 17:06 IST

बॉईज' या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमत ऑफिसला भेट दिली होती. त्यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर,नव्या दमाचे कलाकार ...

बॉईज' या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमत ऑफिसला भेट दिली होती. त्यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर,नव्या दमाचे कलाकार पार्थ भालेराव, या चित्रपटात कबीरची भूमिका साकारणारा सुमंत शिंदे, प्रतिक लाड, शर्वरी जमेनीस, शिल्पा तुळसकर हे उपस्थित होते. या कलाकारांसोबतच या चित्रपटाचे निर्माते राजेंद्र शिंदे आणि लालासाहेब शिंदे यांनी देखील लोकमत ऑफिसला सदिच्छा भेट दिली होती.बॉईज या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा असून या चित्रपटातील सनी लिओनीवर चित्रित करण्यात आलेले कुठे कुठे जायचे हनिमूनला हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहे. त्याचसोबत लग्नाळू, यारियाँ, लेट्स बी फ्रेंड्स ही गाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता अवधूत गुप्ते असून हा चित्रपट ८ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. बॉईज या चित्रपटात या कलाकारांसोबतच झाकीर हुसेन आणि संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. झाकीर प्रेक्षकांना मुख्याध्यापकाच्या तर संतोष शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.बॉईज या चित्रपटात शिल्पा तुळसकर कबीरच्या आईची भूमिका साकारत आहे. आपल्या भूमिकेविषयी शिल्पा सांगते, दिग्दर्शकासमोर कोरी पाटी घेऊन गेले की, दिलेली भूमिका सहजतेने साकारता येते असे मला वाटते. त्यामुळे या चित्रपटाच्याबाबतीत देखील मी तसेच केले आणि त्यामुळे माझी भूमिका चांगलीच खुलून आली आहे. या चित्रपटात शर्वरी जमेनीस कबीरच्या मावशीची भूमिका साकारत आहे. ती सांगते, बॉईज या चित्रपटाची कथा हॉस्टेल लाईफवर आधारित असल्याने या चित्रपटाचे चित्रीकरण करताना मला 'बिनधास्त' या माझ्या चित्रपटाची सतत आठवण येत होती तर या चित्रपटाचे निर्माते राजेंद्र शिंदे सांगतात, पौगंडावस्थेतील वैचारिक द्वंद्व या चित्रपटातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या चित्रपटातील कबीर माझे बाबा कोण आहेत?, कुठे आहेत? या प्रश्नांची सरबत्ती त्याच्या आईकडे करणार आहे. आपली आयडेंटीटी शोधणाऱ्या एका मुलाची ही कथा आहे.Also Read : ​'लग्नाळू' गाणे लिहिण्यासाठी अवधुत गुप्तेला या गोष्टीमुळे मिळाली प्रेरणा