Join us  

शिवाजी महाराजांच्या दुर्गसंपदेचा वैभवशाली इतिहास 'बघतोस काय मुजरा कर 2'मधून भेटीला  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 12:27 PM

'बघतोस काय मुजरा कर 2' या चित्रपटाच्या माध्यमातून हेमंत ढोमे दुर्गसंपदेचा वैभवशाली इतिहास सांगणार आहे.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले आणि जिंकलेदेखील. या सर्व गड किल्ल्यांचे महत्त्व अनेक तरुणांना हेमंत ढोमेने 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन हेमंत ढोमेने केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या आगामी 'बघतोस काय मुजरा कर 2' या चित्रपटाच्या माध्यमातून हेमंत ढोमे दुर्गसंपदेचा वैभवशाली इतिहास सांगणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.

हेमंत ढोमेने  'बघतोस काय मुजरा कर 2'चे पोस्टर शेअर करत लिहिले की, राजं तुमचा मावळा शपथ घेतो...आता तुमच्या दुर्गसंपदेचा वैभवशाली इतिहास अभिमानानं साऱ्या जगाला सांगणार... #BKMK2 #मोहीमदुर्गबांघणी #जयशिवराय #Comingsoon #शिवराज्याभिषेक

महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गड किल्ले हा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. पण महाराज्यांच्या किल्ल्यांची झालेली दुर्दशा, नागरिकांमध्ये असलेली अनास्था तसेच राजकारण्यांनी सत्तेसाठी महाराजांना एक ब्रॅण्ड म्हणूनच उभे केले आहे. या सर्व विषयांवर बघतोस काय मुजरा कर सिनेमा भाष्य करतो.

आता  'बघतोस काय मुजरा कर 2'मधून गड, किल्ल्यांचा वैभवशाली इतिहास पहायला मिळणार आहे. त्यामुळे शिवप्रेमींसाठी हा चित्रपट उत्तम कलाकृती ठरणार आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज