Join us  

आधी राजकरण्यांनी राजीनामे द्यावे, मग ज्येष्ठ कलाकारांवर शूटिंगसाठी बंधनं लादावीत, विक्रम गोखले संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 11:24 AM

कोरोनाकाळात ६० वर्षांवरील कलाकारांना शूटिंग करता येणार नाही. शूटिंग लोकेशनवर या कलाकारांना येता येणार नाही असे आदेश आहेत. 

‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनेक नियम शिथिल झाले आहेत. कोरोनाच्या काळात मनोरंजन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. चित्रपट, टीव्ही या क्षेत्राशी संबंधित लोकांचे हाल सुरू आहेत. त्यामुळेच मालिका चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही अटी-शर्तींचे पालन करावे लागणार आहे. त्यानुसार ६० वर्षांवरील कलाकारांना शूटिंग करता येणार नाही. शूटिंग लोकेशनवर या कलाकारांना येता येणार नाही असे आदेश आहेत. 

 गेल्या अनेक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण ही मागणी सरकारने फेटाळून लावली होती.  त्यामुळे ज्येष्ठ कलाकारांना शूटिंगसाठी नो एंट्रीच आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्याला सरकारने परवानगी द्यावी, असेही ते म्हणाले. 

 

असा कायदा आणण्याआधी राजकारणातील 60 वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असा  सल्ला विक्रम गोखले यांनी दिला आहे.जर राज्य सरकारने कायदा केल्यास ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. त्यामुळे 65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्याला सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी विक्रम गोखले यांनी केली.

टॅग्स :विक्रम गोखलेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस