Join us

विक्रम गोखले आणि गौरी नलावडे एकत्रित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 11:04 IST

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री गौरी नलावडे कान्हा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिकेनंतर ती चित्रपटात दिसल्याने तिचे चाहतेदेखील आनंदात ...

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री गौरी नलावडे कान्हा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिकेनंतर ती चित्रपटात दिसल्याने तिचे चाहतेदेखील आनंदात होते. आता मात्र तिचे चाहते तिच्या दुसºया चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. खास तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गौरी ही लवकरच एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू असल्याचे कळत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात गौरीसोबत मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्गज कलाकार विक्रम गोखले असणार आहेत असे कळते. मात्र या चित्रपटाचे नाव काय आहे हे अदयापदेखील गुलदस्त्यात आहे. तसेच या चित्रपटात आणखी कोण असणार आहे हे देखील कळाले नाही. पण गौरी नलवाडे ही या दिग्गज कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने सध्या ती आनंदात असल्याचे समजत आहे. त्याचबरोबर सध्या ती एक वेबसीरीज करण्यास सज्ज झाली आहे. तिची ही वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. यापूर्वी गौरीने स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य होते. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या आज ही लक्षात आहे. या मालिकेनंतर ती अभिनेता वैभव तत्ववादी आणि गश्मीर महाजनीसोबत कान्हा या चित्रपटात झळकली आहे. आता गौरी एका नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखविताना दिसत आहे. मालिका, चित्रपट, नाटकनंतर आता ही अभिनेत्री वेबसीरीज करणार असल्याने तिच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असणार हे नक्की. चला तर मग गौरीचा दुसरा चित्रपट आणि वेबसीरीजची थोडी प्रतिक्षा करूयात.