Join us  

VIDEO: प्रजासत्ताक दिनानिमित्त मानसी नाईकने नवरा प्रदीप खरेरासोबतचा व्हिडीओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 12:49 PM

प्रजासत्ताक दिनानिमित्त मानसी नाईकने नवरा प्रदीप खरेरासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

देशभरात आज ७२वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सिनेइंडस्ट्रीतील कलाकार देखील आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक हिने तिचा नवरा प्रदीप खरेरासोबत प्रजासत्ताक दिनानिमित्त चक दे इंडिया या गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे.

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्नानंतर आता ती प्रदीप खरेराच्या गावी फरीदाबादला गेली आहे. तिथून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता तिने प्रजासत्ताक दिनानिमित्त नवरा प्रदीप खरेरासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघे चक दे इंडिया या गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसत आहेत. यासोबत तिचा नवरा इंटरनॅशनल बॉक्सर असल्यामुळे त्याचे विनर बेल्ट घेऊन नाचताना दिसत आहेत. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की,  चक दे इंडिया डब्ल्यू बी सी एशिया चॅम्पियन माझा किंग प्रदीप खरेरा. त्याची बायको असल्याचा मला अभिमान वाटतो.

मानसीचा भावी पती हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.

मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत. एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

टॅग्स :मानसी नाईकप्रजासत्ताक दिन