Join us

विभावरी देशपांडेचे होम स्वीट होम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 17:06 IST

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री विभावरी देशपांडे ही लवकरच एका आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. होम स्वीट होम असे या ...

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री विभावरी देशपांडे ही लवकरच एका आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. होम स्वीट होम असे या चित्रपटाचे नाव आहे. ऋषीकेश जोशी दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सला विभावरी देशपांडे सांगते, ऋषीकेश जोशीचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. त्याच्या पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूपच आनंदी आहे. त्याचबरोबर तो माझा खूपच जूना मित्र आहे. अत्यंत हुशार, बुध्दीमान असा आहे. त्याच्याकडे अनुभव, उत्तम नाटककार आणि विनोदाची उत्तम जाणीव असणारा हा अभिनेता आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पंसतीस उतरेल हे नक्की. या चित्रपटात मोहन जोशी आणि रिमा लागू हे दोन दिग्गज कलाकार असल्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना एक प्रकारचे वर्कशॉपच अटेंड करण्याची संधी मिळाली असे वाटते. तसेच या चित्रपटात माज्यासोबत स्पृहा जोशीदेखील असणार आहे. तसेच या चित्रपटाची  स्क्रीप्ट ऋषीकेश जोशी, वैभव जोशी आणि मुग्धा गोडबोले यांची आहे. या चित्रपटात माझी छोटी भूमिका आहे. मात्र या चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान मला खूप काही शिकायला मिळाले. यापूर्वी विभावरीने मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहीट चित्रपट दिले आहेत. यामध्ये श्वास, सातच्या आत घरात, नटरंग, बालगंधर्व, देऊळ, चिंटू अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर तिने आपल्या अभिनयाने रंगभूमीवरदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. तसेच ती आता बॉलिवुडची तगडी अभिनेत्री स्वरा भास्करसोबतदेखील आगामी हिंदा चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.