Join us  

पॅरिस फिक्टिव्ह फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' शॉर्ट फिल्मला आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 4:43 PM

'माझ्या नव-याची बायको' या मालिकेमधून इशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविडची नुकतेच वीरंगणा ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली आहे.

ठळक मुद्दे विरांगणा या लघुपटाला सई-पियुषने संगीत दिले आहेलघुपटाची संपूर्ण संकल्पना ही अभिनेत्री आदिती द्रविडची आहे

'माझ्या नव-याची बायको' या मालिकेमधून इशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविडची नुकतेच वीरंगणा ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर युट्यूबवर आलेली विरांगणा ही शॉर्टफिल्म सीमेवर धारातिर्थी पडणा-या सैनिकांच्या वीरपत्नींविषयीची आहे. ह्या शॉर्टफिल्मला पॅरिसच्या मानाच्या फिक्टिव्हा फिल्म फेस्टिव्हलकडून आमंत्रण आलं आहे. पॅरिस फिक्टिव्हा फेस्टिव्हलमध्ये सिलेक्ट झालेली वीरांगणा ही भारतातली एकमेव शॉर्ट फिल्म आहे.

विरांगणाविषयीयी आदिती म्हणते, “विरांगणा म्हणजे धाडसी स्त्री. मी ह्या लघुपटात एका सैनिकाच्या पत्नीच्या व्यक्तिरेखेत आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सेना अहोरात्र सीमेवर तैनात असते. आपल्या जीवाची तमा न बाळगता लढणा-या ह्या सैनिकांना मानसिंक बळ देण्याचे काम त्यांचे कुटूंबिय करतात. हे कुटूंबिय खरं तर आपले ‘अनसंग हिरोज’ आहेत. सैनिक हा कोणाचा तरी पिता, मुलगा पती असतो. पण आपली वैयक्तिक कर्तव्य बाजूला टाकून देशरक्षणाचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडणा-या सैनिकांच्या खंबीरपणे पाठिशी उभे असतात, ते त्यांचे कुटूंबिय. देशासाठी स्वार्थत्याग करणा-या वीरपत्नींना आम्ही ह्या शॉर्टफिल्ममधून श्रध्दांजली अर्पित केली आहे.”

फिक्टिव्ह फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाल्याचा आनंद व्यक्त करताना आदिती सांगते, “ ह्या लघुपटात एक ही संवाद नाही आहेत. पार्श्वसंगीतावरच ह्यामध्ये अभिनय करायचा होता. आणि डोळ्यांनी संवाद बोलायचे होते. अभिनेत्री म्हणून हे एक चॅलेंज होते. प्रेक्षकांकडून युट्यूबवर रिलीज झालेल्या ह्या फिल्मला भरघोस प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर मानाच्या समजल्या जाणा-या फिक्टिव्हकडून आमंत्रण आल्याने मला अतिशय आनंद झाला आहे.” 

यंदा 12 आणि 13 एप्रिलला फेक्टिव्ह फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. टायनी टॉकीज आणि मुक्तायन निर्मित, आर आर विजन प्रस्तुत, सागर राठोड दिग्दर्शित विरांगणा ह्या लघुपटाला सई-पियुषने संगीत दिले आहे. लघुपटाची संपूर्ण संकल्पना ही अभिनेत्री आदिती द्रविडची आहे.

 

टॅग्स :अदिती द्रविड