Join us  

रमाई या चित्रपटात वीणा जामकर दिसणार रमाबाई आंबेडकर यांच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 11:24 AM

रमाई या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी देखील अनेक बारिकसारिक गोष्टी जाणून घेता येणार आहेत.रमाई यांची भूमिका साकारण्यासाठी रमाई या चित्रपटाच्या टीमने वीणा जामकरची निवड केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई पत्नी यांच्यावर आधारित रमाई हा चित्रपट लवकरच येणार असून या चित्रपटाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री रमाई या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रमाई या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबतच त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्याविषयी देखील अनेक बारिकसारिक गोष्टी जाणून घेता येणार आहेत.रमाई यांची भूमिका साकारण्यासाठी रमाई या चित्रपटाच्या टीमने वीणा जामकरची निवड केली आहे. वीणा जामकरने आजवर अनेक प्रकारच्या भूमिका साकरल्या आहेत. पण ती पहिल्यांदाच एक ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. ती रमाई या चित्रपटात रमाबाई यांची भूमिका साकारत असून सध्या या भूमिकेसाठी जोरदार तयारी करत आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात रमाबाई यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यांच्या कार्यात रमाबाई यांचा मोलाचा वाटा होता. बाबासाहेब यांना त्यांनी नेहमीच साथ दिली. ते शिक्षणासाठी परदेशात गेले, त्यावेळी देखील घराची संपूर्ण जबाबदारी त्यांनीच सांभाळली होती. त्या स्वतः देखील चांगल्या शिकल्या होत्या. त्यांच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टी रमाई या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहेत. या चित्रपटात त्यांचा बालपणापासूनचा प्रवास दिग्दर्शकाने मांडला आहे. दिग्दर्शक बाळ बरगाले या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीमच या चित्रपटावर सध्या चांगलीच मेहनत घेत आहे. वीणाने आज तिच्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक स्थान निर्माण केले आहे. तिने रंगभूमीवरून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. खेळ मांडियेला, चार दिवस प्रेमाचे अशी आजवर तिची अनके नाटकं गाजली आहेत. तिने गाभ्रीचा पाऊस, लालबाग परळ, वळू, विहिर यांसारख्या चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तुकाराम या चित्रपटात देखील ती तुकाराम यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. तिच्या आजवरच्या भूमिकांप्रमाणे रमाईमधील भूमिकादेखील प्रेक्षकांना आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

टॅग्स :वीणा जामकर