Join us  

वर्षा उसगांवकर यांच्या बहिणी आहेत त्यांच्या इतक्याच सुंदर, पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 12:44 PM

वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते. त्यांना दोन बहिणी आहेत.

ठळक मुद्देवर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते. त्यांना दोन बहिणी आहेत. डॉ. तोषा कुराडे आणि मनीषा तारकर.

मराठीसह हिंदी सिनेमातही आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. त्यांनी आपला अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीत 'गंमत- जंमत', 'हमाल दे धमाल', 'लपंडाव', 'भुताचा भाऊ' यांसारख्या मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या. इतकंच नाही तर मराठीतील या यशामुळे वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली.

वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते. त्यांना दोन बहिणी आहेत. डॉ. तोषा कुराडे आणि मनीषा तारकर. डॉ तोषा कुराडे या पणजी, गोवा या ठिकाणी ‘डॉ तोषाज लॅबोरेटरी अँड मेडिकल सेंटर’ चालवतात. डॉ तोषा या आपली बहीण वर्षाप्रमाणेच दिसायला अगदी देखण्या आहेत. तर त्यांची दुसरी बहीण मनीषा तारकर या बिजनेस वूमन आहेत. गोव्यातील माईनस्केप मिनरल्स, तारकर ब्रदर्स अशा अनेक कंपन्यांचा कारभार त्या अगदी व्यवस्थित सांभाळतात.

मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह वर्षा उसगांवकर रुपेरी पडद्यावर झळकल्या. 'परवाने', 'तिरंगा', 'हस्ती', 'दूध का कर्ज', 'घर आया मेरा परदेसी' अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी भूमिका साकारल्या. एकेकाळी मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना केली जात असे. त्यांना आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्याविषयी जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते. छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून वर्षा उसगांवकर रसिकांचे भरघोस मनोरंजन करत आहेत.

टॅग्स :वर्षा उसगांवकर