Join us  

सावनी रविंद्रच्या ‘वंदे गणपती’ गाणे ठरतंय हिट, या माध्यमातून तिची इच्छाही झाली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 5:13 PM

गायिका सावनी म्हणते, “वंदे गणपती ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली बंदिश माझ्या आईच्या गुरू वीणा सदस्रबुध्दे ह्यांनी गायलेली आहे. त्यामुळे लहानपणापासून ह्या बंदिशीसोबत एक ऋणानुबंध जुळला आहे.

सुमधूर गळ्याची गायिका सावनी रविंद्रने मराठी, गुजराती तमिल, तेलगु, मल्याळम, कन्नडा आणि बंगाली अशा सात भारतीय भाषांमध्ये गाणी गाऊन बहुभाषिक रसिंकांवर आपल्या सुरांची मोहिनी घातली आहे. यानंतर नुकतीच तिने गणेशोत्सवानिर्मित्ताने ‘वंदे गणपती’ ही संस्कृत बंदिश गायली. ह्या गाण्याला सध्या संगीत रसिंकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय.संस्कृतमध्ये पदवी घेतलेल्या गायिका सावनी रविंद्रची ब-याच अवधीपासून संस्कृतमध्ये गाणे गाण्याची इच्छा होती. ही इच्छा ‘वंदे गणपती’ ह्या गाण्यातून पूर्ण झाली आहे.

गायिका सावनी म्हणते, “वंदे गणपती ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली बंदिश माझ्या आईच्या गुरू वीणा सदस्रबुध्दे ह्यांनी गायलेली आहे. त्यामुळे लहानपणापासून ह्या बंदिशीसोबत एक ऋणानुबंध जुळला आहे. पंडित काशीनाथ बोडस ह्यांची ही रचना सतत मनात रूंजी घालत राहिलीय. त्याच बंदिशीला कर्नाटिक शास्त्रीय संगीताची किनार देण्याचं काम माझा मित्र आर. संजय ह्याने केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना एक सकारात्मक मंगलमय गाणे रसिकांच्या भेटीला घेऊन आले. आणि ते रसिकांनी उचलून धरले, ह्याचा आनंद असल्याचे तिने म्हटले आहे.”

सावनीच्या कर्नाटक शास्त्रीय संगीतात सजलेल्या सुरांना अभिनेत्री आणि नृत्यांगना अदिती द्रविडने भरतनाट्यम शैलीत साकारल्याने हे गाणे व्हिज्युअल ट्रिटच ठरत आहे.