Join us  

वैदही परशुरामी करतेय एक नवी सुरुवात, फॅन्सनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 6:30 AM

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी.

आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. अभिनयासह नृत्य कलेतही ती पारंगत आहे. वैदेही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते. वैदहीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे वैदही चर्चेत आली आहे. या फोटोला आणि अचानक तुम्हाला कळते की तुम्ही काहीतरी नवीन सुरु करताये. फोटोला दिलेल्या हॅशटॅगमध्ये वैदहीने 'नवीन दिवस, नवी सरप्राईज, उत्सुकता.'

या फोटोवरुन वैदही नव्या सिनेमाची सुरुवात करतेय की आणखी काही हे अद्याप गुलदस्त्यात आहे. वैदहीच्या या नव्या सुरुवातीसाठी तिच्या फॅन्सनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आता ही नवी सुरुवात नक्की काय आहे हे आपल्याला वैदहीच सांगू शकते. 

अभिनेत्री वैदही परशुरामीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून वैदहीने मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले.तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.

 रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 

टॅग्स :वैदेही परशुरामी