Join us  

वैभव तत्त्ववादीने शेअर केला नवा फोटो, फॅन्सनी दिली अशा रिअ‍ॅक्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 6:30 AM

वैभव विद्या बालनसोबत काम करणार आहे.

अभिनेता वैभव तत्त्ववादीने कॉफी आणि बरंच काही, व्हॉट्सअप लग्न यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर त्याने अधिराज्य गाजवले आहे. बाजीराव मस्तानी, मणिकर्णिका यांसारख्या हिंदी चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. वैभव सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती फॅन्सना देत असतो. वैभवने इन्स्टाग्रामवर हातात कॉफी घेऊन सोफ्यावर  बसलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो खूपच चिलिंग मूडमध्ये बसतो आहे. 

 लवकरच वैभव त्रिभंगा सिनेमात दिसणार आहे. त्रिभंगा या सिनेमाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे करत असून हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पहायला मिळणार आहे. या चित्रपटात मुंबईतील एका कुटुंबाची कथा रेखाटण्यात आली आहे. १९८०च्या दशकापासून आतापर्यंत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांची कथा व त्यांच्या जीवनाशी निगडीत समस्या दाखवले जाणार आहेत. याशिवाय वैभव विद्या बालनसोबत काम करणार आहे. प्रसिद्ध गणितज्ज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये वैभव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

वैभव मराठी चित्रपट 'पाँडिचेरी'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात तो सईसोबत दिसणार आहे.. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.

 

टॅग्स :वैभव तत्ववादी