Join us  

उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 3:35 PM

Corona Virus : बॉलिवूड सेलिब्रेटींनंतर आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच बॉलिवूडमध्येदेखील रणबीर कपूर, मनोज वाजपेयी, संजय लीला भन्साळी आणि तारा सुतारिया या कलाकारांना एका पाठोपाठ कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान आता मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजेच उमेश कामत आणि प्रिया बापट यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. ही माहिती खुद्द उमेशनेच त्याच्या इंस्टा स्टोरीवर दिली आहे. 

उमेश कामत आणि प्रिया बापटने सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. उमेशने लिहिले की,  दुर्देवाने प्रिया आणि माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघे होम क्वारंटाइन आहोत. आम्ही दिलेल्या सूचनेनुसार उपचार आणि काळजी घेत आहोत. कृपया मागील आठवड्याभरात आमच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः जाऊन कोरोनाची टेस्ट करून घ्यावी किंवा स्वतःला आइसोलेट करून घ्या.

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी नुकतीच आणि काय हवे या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरूवात केली होती. ही माहिती खुद्द त्यांनीच सोशल मीडियावर दिली होती. 

सध्या बॉलिवूडच्या बऱ्याच सेलिब्रेटींना कोरोनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत अभिनेता रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी, आशिष विद्यार्थी आणि तारा सुतारिया यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

मुंबईत मंगळवारी १ हजार ९२२ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ४७ हजार ५८१ वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत ११ हजार ५३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी १५६ दिवस इतका आहे.

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतकोरोना वायरस बातम्या