Join us  

उमेश कामत आणि प्रिया बापटनं लुटला स्काय डायव्हिंगचा आनंद; अभिनेता म्हणाला, "मला आयुष्यात कधी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 9:28 AM

Umesh Kamat-Priya Bapat : उमेश कामत आणि प्रिया बापट सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत आणि तिथे धमालमस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत.

उमेश कामत आणि प्रिया बापट ही मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. ते दोघे सोशल मीडियावर सक्रिय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. सध्या ते दोघे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत आणि तिथे धमालमस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. दरम्यान नुकतेच त्या दोघांनी तिथे स्काय डायव्हिंगचा आनंद लुटला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपला अनुभव सांगितला आहे.

उमेश कामतने इंस्टाग्रामवर स्काय डायव्हिंगचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं मी कधी स्कायडाइव्ह करण्याचा विचार सुद्धा करू शकेन. मला उंचीची भयंकर भिती वाटते, उंचीचा फोबिया म्हणतात ते काय ते. साध्या इमारतीच्या गच्चीवरून खाली बघितलं तरी हातपाय गळून जातात. म्हणूनच आयुष्यात एकच काय तो ट्रेक केला आणि शपथ घेतली परत कधीही ट्रेकिंगच्या वगैरे भानगडीत पडायचं नाही. आमचा ऑस्ट्रेलियाा दौरा ठरला तेव्हा ४ दिवस ट्रीप एक्स्टेंड करायचं ठरवलं. पण प्लानिंग करायला फारसा वेळ नाही मिळाला. तरी स्कायडाइव्ह हा विचार दूर दूर पर्यन्त नव्हता, पाण्याची भिती नसल्याने स्कुबा डाइव्ह करायचं मी आणि प्रियाने ठरवलं. पण वेळेच्या अभावामुळे क्वीन्सलॅण्डला जाउन स्कुबा करणं अवघड दिसायला लागलं.

तो पुढे म्हणाला की, आणि अचानक एक दिवस कळलं आशुतोषने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर स्कायडाइव्हच बुकिंग केलय.प्रिया उत्सुक झाली तिने ठरवलं ती पण करणार आणि तिने मला विचारलं तू पण कर ना. तेव्हा बुकिंगसाठी सगळे पैसे भरायचे नव्हते,आणि मी त्या मोहाला बळी पडलो,म्हटलं आता हो म्हणू नंतर माघार घेउ. पण तो दिवस आणि स्कायडाइव्ह झाल्यावरचा आजचा दिवस....मी माझी भिती घालवण्यासाठी केलेला प्रयत्न हा अविस्मरणीय अनुभव होता.

मला हे करण्यासाठी कॉन्फिडंस देणाऱ्या सगळ्यांना मनापासून आभार. पण खास आभार आणि खूप प्रेम प्रिया आणि आशुला, त्यांना माझी भिती माहीत होती पण मी हा अनुभव घ्यावा अशीही मनापासून इच्छा होती. पण मला फोर्स न करता, हळूच मधे मधे कॉन्फिडन्स देत माझ्या भीतीला कॉन्फिडन्समध्ये बदललं म्हणून थँक्यू. Thank you For being with me 

टॅग्स :उमेश कामतप्रिया बापट