Join us

'पोश्टर गर्ल'मधील भूमिकेमुळे अभिनयाला कलाटणी : सोनाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:50 IST

 विविध लूक्समुळे चर्चेत असलेली या चित्रपटामधली तिची भूमिका अभिनयाला कलाटणी देणारी असल्याचे सोनाली सांगते.एक स्वतंत्र विचारांची ही एक ...

 विविध लूक्समुळे चर्चेत असलेली या चित्रपटामधली तिची भूमिका अभिनयाला कलाटणी देणारी असल्याचे सोनाली सांगते.एक स्वतंत्र विचारांची ही एक मुलगी आहे. चित्रपटाच्या टीझरमधून 'ती' वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसते हे खरे आहे. पण तिचे हे लूक्स एका गाण्याच्या माध्यमातून समोर येतात. काहीसा ब्लँक कॉमेडीकडे झुकणारा महिलाकेंद्रित असा चित्रपटाचा विषय असल्याने अभिनयाला भरपूर वाव आहे. 'टायटल रोल'च्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांना सोनाली यात पाहायला मिळेल.यापूर्वी 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटात अशाच प्रकारे आव्हानात्मक भूमिका करण्याची संधी मिळाली होती. तशाच प्रकारची 'पोश्टर गर्ल'मधील ही भूमिका आहे. प्रेक्षकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या या चित्रपटाने नक्कीच पूर्ण होतील, असा विश्‍वासही तिने व्यक्त केला. प्रत्येक कलाकाराची एक जर्नी ठरलेली असते. रंगभूमी प्रत्येक कलाकाराला खुणावत असते. पण तशी योग्य वेळ यावी लागते.. ती मिळाली तर नक्कीच रंगभूमीवर काम करायला आवडेल, असेही ती सांगते.