Join us  

Trending : भरत जाधवलाही पडली तमिळ गाण्याची भुरळ, व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 6:45 PM

Bharat Jadhav Dancing On Vaathi Coming Tamil Song.भरत जाधव यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत धमाकेदार डान्स करताना पाहायला मिळत आहे.

मराठीतील सुपरस्टार असं ज्यांना म्हटलं जातं ते अभिनेते म्हणजे भरत जाधव. आपल्या अभिनयाने भरत जाधव यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. चित्रपट, रंगभूमी किंवा छोटा पडदा या तिन्ही माध्यमांमध्ये भरत जाधव यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे.तिन्ही माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत भरत जाधव यांनी आपल्या अभिनय कौशल्यातील अष्टपैलूत्व दाखवलं आहे.

 

 

भरत जाधव सोशल मीडियावरही बरेच अॅक्टिव्ह असतात. स्वतःचे व्हिडीओ सिनेमा किंवा नाटकांची माहिती ते चाहत्यांस सोशल मीडियावर शेअर करत असतात. भरत जाधव यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत धमाकेदार डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्यांनीच चाहत्यांसह हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओ शेअर होताच चाहत्यांनी लाईक्स देत पसंती दिली आहे. सध्या डान्सचा व्हिडीओ सध्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला असून तो व्हायरल होत आहे. डान्स करताना भरत जाधवमधली ऊर्जा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. 

सोशल मीडियावर कलाकारांची धूम, तमिळ गाण्यावर ठेका धरत स्वीकारलं नवं चॅलेंज

भरत जाधवच नाही तर इतरही कालाकार शूटिंगमधून मिळालेल्या वेळेत अशाच प्रकारे याच गाण्यावर थिरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनोरंजनाची जबाबदारी पार पाडत असतानाच पडद्यामागे देखिल कलाकारांची धमाल अविरतपणे सुरु असते. सोशल मीडियावरचं कोणतंही चॅलेंज असलं तरी ही कलाकारमंडळी मागे नसतात. नुकतंच या कलाकारांनी एका सुपरहिट तमिळ सिनेमातल्या सुपरहिट गाण्यावर ठेका धरला. सध्या वेगवेगळ्या मालिकेतल्या कलाकारांनी 'वाथी कमिंग' या तमिळ गाण्याचे चॅलेंज स्विकारताना दिसत आहे. सध्या हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. रसिकांनीही आवडत्या कलाकारांचा डान्सिंग अंदाज पाहून लाईक्सचा वर्षाव करत आहेत.  

टॅग्स :भरत जाधव