Join us  

'कानभट' चित्रपटाचा ट्रेलर आला प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 8:46 PM

वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविणारा 'कानभट' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविणारा 'कानभट' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्या अपर्णा एस. होशिग यांनी या चित्रपटातून अपर्णा दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या चित्रपटात अभिनेता भाव्या शिंदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. 

कानभट चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका लहान मुलाच्या (ऋग्वेद मुळे) स्वप्नांबद्दल आणि इच्छेबद्दलच्या ह्या प्रवासात, त्या मुलाला वडीलधाऱ्यांच्या शब्दांचे पालन करण्यास भाग पाडले जाते परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असते, ज्यामुळे नायक एका अनोख्या वाटेवर जाताना आपणास दिसतो. एकूणच कथेत वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविले गेले आहेत.

अपर्णा एस होशिंग म्हणाल्या, “मी दिग्दर्शन करण्यासाठी माझा पहिला चित्रपट म्हणून मराठी भाषेतील चित्रपटाला निवडले, कारण आशययुक्त कथानकआणि अभिनय यामुळे, आता मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे. मी नेहमीच कथानकाला आणि विषयाला प्राधान्यदेते. आता मी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचा ट्रेलर आउट झाला आहे आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ”

अपर्णा एस होसिंग यांनी दिग्दर्शित केलेला ‘कानभट्ट’हा चित्रपट रॅश प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार केला असून, अपर्णा एस होशिंग ह्याच निर्मात्या देखील आहेत. हा पीरियड ड्रामा १९ फेब्रुवारी २०२१ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.