Join us

सचिन कुंडलकर, सई आणि प्रिया 'वजनदार' साठी एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:47 IST

युवा निर्मात्या विधी कासलीवाल यांनी दिग्दर्शक सचिन कुंडलकर, सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांना 'वजनदार'साठी एकत्र आणले आहे. आता ...

युवा निर्मात्या विधी कासलीवाल यांनी दिग्दर्शक सचिन कुंडलकर, सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांना 'वजनदार'साठी एकत्र आणले आहे. आता तुम्ही म्हणाल, 'वजनदार' काय आहे.. तर लँडमार्क फिल्मसच्या बॅनरखाली झळकळणारा हा चित्रपट म्हणजे दोन मैत्रिणींची कथा आहे. या कथेमध्ये या दोघीही अभिनेत्री अगदी वेगळ्या रूपात दिसून येणार आहेत. विधी या नव्या पिढीच्या निर्मातीने 'इसी लाईफ मैं' च्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. तसेच सचिन, वैभव मांगले आणि भाऊ कदम यांच्या व्यक्तिरेखा असलेल्या 'सांगतो ऐका'ची निर्मिती केली. अनेक पुरस्कार विजेत्या इंग्रजी डॉक्युमेंट्री देखील त्यांनी बनविल्या आहेत.source: www.newsmyntra.com