Join us  

'माझा अगडबम'चे शीर्षकगीत सोशल मीडियावर लॉन्च,अवघ्या काही तासातच ठरलं हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 3:06 PM

'माझा अगडबम' असे या सिक्वेलचे नाव असून, नुकतेच या सिनेमाचे शीर्षकगीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाँन्च करण्यात आले. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असे हे शीर्षकगीत प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे.

नावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या, महाराष्टाच्या लाडक्या 'नाजुका'च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगात आली आहे. सुपरहिट 'अगडबम'च्या सिक्वेलमधून ती पुन्हा येत असल्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत 'माझा अगडबम' असे या सिक्वेलचे नाव असून, नुकतेच या सिनेमाचे शीर्षकगीत सोशल नेटवर्किंग साईटवर लाँन्च करण्यात आले. नाजुकाच्या व्यक्तिमत्वाला साजेल असे हे शीर्षकगीत प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत आहे.

 

'आसमान का थरथरते...' असे बोल असलेले हे शीर्षकगीत खूप दमदार आहे.मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केलेल्या या एनर्जेटीक गाण्याला टी. सतीश चक्रवर्ती यांचे प्रभावी संगीत लाभले आहे. शिवाय अपेक्षा दांडेकरच्या दमदार आवाजामुळे हे गाणे अधिकच वजनदार बनले आहे. गुणी अभिनेत्री तृप्ती भोईरवर चित्रित करण्यात आलेले हे शीर्षकगीत रसिकांना ठेका धरण्यास भाग पाडते.

'माझा अगडबम' या सिनेमात गुणी अभिनेत्री तृप्ती भोईरची प्रमुख भूमिका असून, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माती अशा चार वेगवेगळ्या भूमिकेमधून ती लोकांसमोर येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती तृप्ती भोईरला टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांची साथ लाभली असून, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. 'अगडबम'च्या दमदार यशानंतर डबल धमाका करण्यास येत असलेला हा 'माझा अगडबम' येत्या २६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.         

या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे. लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आले.

'माझा अगडबम'च्या या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो. पण या दोघांबरोबरच आणखीन एक अगडबम व्यक्ती यात आपल्याला दिसून येत आहे. अशा या दोन अगडबम व्यक्तींच्यामध्ये अडकलेला सुबोध भावे या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.  

टॅग्स :सुबोध भावे