Join us  

मराठमोळी ही अभिनेत्री झळकणार साउथच्या सिनेमात, बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर करतेय कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:12 AM

मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने मराठी मालिका, चित्रपटांव्यतिरिक्त हिंदी मालिकेत काम केले आहे.

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी सुभाष (Pallavi Subhash) कमबॅक करणार आहे. लवकरच ती एका चित्रपटात झळकणार आहे. पल्लवी सुभाषला वकिलीचे शिक्षण घ्यायचे होते मात्र आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच तिने मॉडेलिंग क्षेत्रात नशीब आजमावले. इथेच तिला नाटकातून अभिनयाची संधी मिळाली. व्यावसायिक जाहिराती करत असतानाच पल्लवीने चार दिवस सासू(Char Divas Sasuche)चे या मालिकेत महत्वाची भूमिका साकारली.

साहेब बीबी आणि मी या मालिकेनंतर तुम्हारी दिशा, करम अपना अपना, अधुरी एक कहाणी, कसम से, महाभारत अशा हिंदी मराठी मालिकेतून तिला काम करण्याची संधी मिळाली. मराठी, हिंदी, कन्नड आणि तमिळ अशा विविध भाषिक चित्रपटातून पल्लवीने वेगवेगळ्या भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले.

२०१९ साली मिरांडा हाऊस या रहस्यमयी मराठी चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी आणि साईंकित कामत या त्रिकुटाभोवती चित्रपटाचे कथानक गुरफटलेले पाहायला मिळाले . यानंतर पल्लवी कोणत्या प्रोजेक्टमध्ये पाहायला मिळाली नाही. परंतु आता जवळपास तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पल्लवी तमीळ चित्रपटातून मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘सेकंड शो’ हा तिचा मुख्य भूमिका असलेला आगामी तमीळ चित्रपट आहे. या चित्रपटात पल्लवी सुभाष सोबत अजमल अमीर, विद्या प्रदीप, हेमल रनसिंघे हे कलाकार झळकणार आहेत. सेकंड शो या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सेकंड शो हा अॅक्शन थ्रिलर, सस्पेन्स आणि हॉरर मुव्ही आहे. हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार असे बोलले जात होते मात्र काही कारणास्तव प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. आता लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :पल्लवी सुभाषमिलिंद गुणाजी