सखाराम बाइंडर नाटकाची टीम करणार बॅकस्टेज कलाकारांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 13:52 IST
सध्या सखाराम बाइंडर या नाटकाची चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण हे नाटक एक दोन नाही तर तब्बल सोळा ...
सखाराम बाइंडर नाटकाची टीम करणार बॅकस्टेज कलाकारांना मदत
सध्या सखाराम बाइंडर या नाटकाची चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण हे नाटक एक दोन नाही तर तब्बल सोळा वर्षानी पुन्हा रंगभूमीवर सादर करण्यात आले आहे. या नाटकामध्ये मुख्य भूमिकेत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि संदीप पाठक पाहायला मिळत आहे. आता या नाटकाचा काही दिवसातच पाचवा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने या नाटकाच्या टीमने एक अनोखा उपक्रम करणार असल्याचे अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने सोशलमीडियावर सांगितले आहे. मुक्ताने नुकतीच सोशलमीडियावर एक पोस्ट अपलोड केली आहे. ती आपल्या या पोस्टच्या माध्यमातून सांगते, १६ वषार्नंतर 'सखाराम बाइंडर' पुन्हा ललितकला केंद्र च्या त्याच टीम बरोबर सादर करण्याचा आनंद आहेच पण त्याच बरोबर आम्ही एका चांगल्या कामासाठी हे प्रयोग करतोय याचं जास्त समाधान वाटतंय. मराठी रंगभूमी, नाट्यव्यवसाय त्याची १०० पेक्षा जास्त वर्षांची उज्वल परंपरा आहे. यामधे जितकं योगदान निमार्ते, लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्यांच आहे तितकच मोलाचं योगदान आहे सगळ्या रंगमंच कामगारांच. मला नेहमी वाटतं की हे रंगमंच कामगार म्हणजे नाटकाचा भक्कम पाया असतात. पण त्यांच्या कष्टांच्या मानाने त्यांना मिळणारं मानधन , सोयीसुविधा नेहमीच कमी असतात. त्यामुळे दिनू काकांशी चर्चा करून आमच्या ललितकला केंद्र च्या माजी विद्यार्थ्यांच्या सगळ्या टीम नी निर्णय घेतला की या ५ प्रयोगातून उभा राहील तो निधी आमच्या या बॅकस्टेज च्या मित्रांना द्यायचा. पण प्रयोग ५ असोत वा ५०० नाटक तर व्यवस्थित उभं व्हायला हवं. नेपथ्य, प्रकाशयोजना, संगित सगळंच. मग सगळ्या जवळच्या मित्रांकडे शब्द टाकले, प्रयोगाचा हेतू कळताच राहुल रानडे, प्रसाद वालावलकर , अजय कासुर्डे, संजय कृष्णाजी पाटील सर,अंजली अंबेकर मॅडम, कौस्तुभ दिवाण,सेवा मोरे, जयश्री जगताप, उमेश जगताप, विनायक कावळे आणि ही यादी वाढतेच आहे असे अनेक जवळचे स्नेही बरोबर उभे राहीले. या सगळ्यांच्या मदतीने अनामिका-रसिका सादर करत आहे