Join us  

Nehha Pendse's Wedding : नेहा पेंडसेच्या हनीमूनचा पहिला फोटो आला समोर, एकमेकांसोबत असे एन्जॉय करतंय हे कपल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 11:43 AM

Nehha Pendse and Shardul Bayas's Wedding : नेहाचा पती शार्दुल हा महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबातील आहेत. लग्नाआधी दीर्घकाळ नेहा व शार्दुल एकमेकांना डेट करत होते.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं हे कपल अखेर लग्नबंधनात अडकलं. सोशल मीडियावर  या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. दोघेही सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. त्यांच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतच्या सगळ्या अपडेट त्यांनी चाहत्यांसह शेअर केल्या.  त्यामुळे लग्नानंतर आता हे कपल सध्या काय करते आणि कुठे आहे याची उत्तरं तुम्हाला या दोघांचे हे फोटो पाहून मिळतील. 

 लग्नानंतरचा या दोघांचा पहिला फोटो समोर आला आहे. दोघेही एकमेकांसोबत एकांतात वेळ घालवताना दिसत आहे. लग्नाआधीच्या किसींग फोटो नंतर आता नेहाचा हा फोटोही सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. याच स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत.  नेहा शार्दुलला मिठी मारत असल्याचे या फोटोत पाहायला मिळत आहे. तसेच नेहा पेंडसेचे चेह-यावरील स्मित हास्य पाहून तिच्या आनंदाचा अंदाज बांधणे अशक्य इतकी ती खुश दिसत आहे.

तिचा हा फोटो पाहून पुन्हा चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे. या फोटोत नेहाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून हातात हिरव्या बांगड्या, मोकळे सोडलेले केस, कपाळावर टीकली अशा श्रृंगारात तिच्या सौंदर्याला आणखीन चारचाँद लागले आहेत. तर पती शार्दूलनेही नेव्ही ब्लु रंगाच्या टी-शर्टमध्ये सुपरकुल अंदाजात पाहायला मिळत आहे. आयुष्याची नवीन सुरूवात केलेल्या या कपलचे फोटो पाहून इतरांनाही कपल गोलची प्रेरणा मिळत असणार हे मात्र नक्की.

नेहाचा पती शार्दुल हा महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबातील आहे. लग्नाआधी दीर्घकाळ नेहा आणि शार्दुल एकमेकांना डेट करत होते. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आजतकच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान नेहाने पती शार्दुलबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. नेहाशी लग्नाआधी शार्दुलची दोन लग्न झाली आहेत. त्याला दोन मुलीदेखील आहेत. या सर्व गोष्टी नेहाला माहिती असल्याचे तिने सांगितले आहे. 

टॅग्स :नेहा पेंडसे