Join us  

बाप-लेकीचे हे फोटो पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल सो क्यूट, स्वप्निल जोशीने लेक मायरासोबतचा गोड फोटो केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:16 PM

मायराच्या जन्मानंतर त्याचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले आहे. मायरा विषयी खास गोष्टी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नीलने सांगितल्या होत्या.

विविध चित्रपटांमधून स्वप्नीलने आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. स्वप्नील सोशल मीडियावरही सक्रीय असतो. या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी संवाद साधतो. आपल्या जीवनातील सुंदर क्षण तो फॅन्ससह शेअर करत असतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर लेकीसोबतचा फोटो शेअर केला. हाच फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोत स्वप्नीलचे आपल्या लेकीवर असलेले जीवापाड प्रेम पाहायला मिळत आहे. लेकीसोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये स्वप्नीलच्या रूपात दडलेला हळवा अन् तितकाच भावनिक बाबाही पाहायला मिळत आहे. बापाचे लेकीवरील हे प्रेम पाहून फॅन्सही भारावले असून त्यांच्याकडून या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. खरेतर मायराच्या जन्मानंतर  त्याचे आयुष्य संपूर्ण बदलून गेले आहे. मायरा विषयी खास गोष्टी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नीलने सांगितल्या होत्या.

मी माझ्या कामाच्या निमित्ताने अनेक वेळा घराच्या बाहेर असतो. त्यामुळे ती मला आवर्जून स्क्रीनवर पाहते. जेवताना तर ती माझी गाणी पाहाते. माझी गाणी पाहिल्याशिवाय तिला जेवण जातच नाही असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. पण कोणत्या गाण्यात एखादी नायिका माझ्या जवळ आली किंवा कोणत्या अभिनेत्रीने मला जवळ घेतले, मला मिठी मारली तर ती जोरारजोरात रडायला लागते. माझ्या वडिलांना कोण कसा काय हात लावू शकते असा प्रश्न तिला पडतो. अभिनेत्री माझ्या मिठीतून बाहेर पडली की, ती हसायला लागते. ही गोष्ट पाहून आम्हाला देखील खूप मजा वाटते.

टॅग्स :स्वप्निल जोशी