Join us  

सुव्रत जोशी आणि सखी गोखलेच्या या क्यूट फोटोचीच आहे सगळीकडे चर्चा, पाहा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 12:17 PM

सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचा आणि सखीचा एक क्यूट फोटो शेअर केला असून हा फोटोला त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडला आहे.

ठळक मुद्देसुव्रतने शेअर केलेल्या या फोटोत तो आणि सखी निखळ हसताना दिसत असून ते दोघे एकमेकांसोबत किती खूश आहेत हे आपल्याला या फोटोवरून दिसून येत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांचा विवाह गेल्या वर्षी ११ एप्रिलला पुण्यात मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. सखी सध्या लंडनमध्ये उच्च शिक्षण घेते आहे. त्यामुळे सखी आणि सुव्रत गेल्या काही महिन्यांपासून लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंना त्यांच्या चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते. मात्र ते दोघे वेगवेगळ्या देशात राहात असल्याने त्यांचे खूपच कमी फोटो त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सखीला ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी ती भारतात आली होती. सुव्रतने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचा आणि सखीचा एक क्यूट फोटो शेअर केला असून हा फोटोला त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडला आहे.

सुव्रतने शेअर केलेल्या या फोटोत तो आणि सखी निखळ हसताना दिसत असून ते दोघे एकमेकांसोबत किती खूश आहेत हे आपल्याला या फोटोवरून दिसून येत आहे. या फोटोसोबत सुव्रतने लिहिले आहे की, मला 2020 मधील प्रत्येक क्षण असाच घालवायचा आहे. 

सुव्रत आणि सखीच्या फॅन्सना त्यांचा फोटो प्रचंड आवडत असून त्या दोघांची जोडी खूपच क्यूट दिसत असल्याचे ते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

सखी आणि सुव्रतने काही दिवसांपूर्वी सेम टू सेम टॅटू बनवला होता. सखी आणि सुव्रतने बनवलेल्या नवीन टॅटूचा फोटो देखील त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. नक्षत्र, दिवस- रात्र, युनिव्हर्स यांचं प्रतिक असणारा टॅटू सुव्रतने त्याच्या हातावर तर सखीने मानेवर गोंदवला होता. सखीला टॅटूची प्रचंड आवड असून तिने तिच्या शाळेतून दिसणार्‍या पर्वतरांगांचं, सखीची आई शुभांगी गोखले यांचं नाव सोबतच फुलपाखरू असे अनेक टॅटू शरीरावर काढले आहेत.

सखी-सुव्रत यांनी दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा या मालिकेद्वारे तर अमर फोटो स्टुडिओ या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. 

टॅग्स :सुव्रत जोशीसखी गोखले