Join us  

डॉ. काशिनाथ घाणेकरमध्ये ही भूमिका साकारतोय सुमीत राघवन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 4:52 PM

 डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमा विषयीची उत्सुकता दिवसांदिवस लोकांमधील वाढत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक  प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर निर्मात्यांनी आज सुमीत राघवनचा लूक आऊट केला आहे.

ठळक मुद्देसुमित या सिनेमात डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारणार आहे ७ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

 डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमा विषयीची उत्सुकता दिवसांदिवस लोकांमधील वाढत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक  प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर निर्मात्यांनी आज सुमीत राघवनचा लूक आऊट केला आहे. सुमीत या सिनेमात डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारणार आहे.  

सुमीतचा लूक अचूक येण्यासाठी टीमने खूप मेहनत घेतली आहे  आणि त्याच्या चेहेऱ्यावरील लकब ठिक येण्यासाठी बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. या  विषयी बोलताना, दिग्दर्शक अभिजीत देशपांडे म्हणाले, “ आम्हाला अगदी सारखे दिसणारे पात्र नको होते तर डॉ. लागूंप्रमाणे पध्दतशीर पात्र हवे होते. डिझाइन करत असताना आम्ही मनात ठेवले होते की सुमीतने डॉ. लागूंची संयमीपणा, त्यांची शब्दसंपत्ती आणि त्यांची जगण्याची शैली सुध्दा अंगिकारली पाहिजे. डॉ.लागूंचे व्यक्तिमत्व सार्वजनिक ठिकाणी वेगळे, मंचावर वेगळे आणि ग्रीनरूम मध्ये वेगळे होते.”

सुमीत राघवने सांगितले, “ का लिजंडचे जीवन साकारणे हे एक स्वप्नच होते. चित्रीकरणाला सुरूवात करण्याआधी मला डॉ.लागूंचे आशीर्वाद मिळाले होते यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या प्रसिध्द माणसाची भूमिका मला साकारायला दिली यासाठी मी निखील साने आणि अभिजीत देशपांडे यांचे आभार मानतो. ही खरंतर तारेवरची कसरत होती कारण मला या विख्यात माणसाची नक्कल करायची नव्हती किंवा अनुकरण करायचे नव्हती तर त्याच वेळी उथळपणे किंवा हिकमती करून ती भूमिका साकारायची नव्हती कारण मी वास्तविक माणसाची भूमिका करत होतो एखाद्या पात्राची नाही.”

१९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या “आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर” मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे, त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमय रीत्या बदलून टाकला होता.क्षकांच्या शिट्ट्या आणि टाळ्यांमध्ये जगणाऱ्या रंगभूमीच्या सम्राटाचे आयुष्य येत्या दिवाळीत म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी मोठया पडद्यावर उलगडणार...२०१८ च्या आरशात रंगभूमीच्या सुवर्णकाळाचा मागोवा.

टॅग्स :काशिनाथ घाणेकरसुमीत राघवन