Join us  

​रेडिओ सिटी सिने अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात सुमेध मुद्गलकरने पटकावली तीन नामांकनं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 12:14 PM

'डान्स महाराष्ट्र डान्स' त्यानंतर 'डान्स इंडिया डान्स सिझन ४', 'दिल दोस्ती डान्स' आणि सम्राट अशोका यांसारख्या मालिका आणि रिअॅलिटी ...

'डान्स महाराष्ट्र डान्स' त्यानंतर 'डान्स इंडिया डान्स सिझन ४', 'दिल दोस्ती डान्स' आणि सम्राट अशोका यांसारख्या मालिका आणि रिअॅलिटी शो मधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला. इतकंच नव्हे तर अगदी कमी वयात सुमेधचा भला मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. उत्तम डान्स करण्यासोबतच त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने सुमेधने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. सुमेध सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याला रेडिओ सिटी सिने अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यात तीन नामांकनं मिळाली आहे. मांजा चित्रपटातून सुमेधने मराठीसृष्टीत पदार्पण केले त्यानंतर त्याने व्हेंटिलेटर या चित्रपटात काम केले. मांजा या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण या चित्रपटात काम करायचे की नाही याविषयी तो संभ्रमात होता. कारण त्याचा एक खूप चांगला प्रोजेक्ट काहीच दिवसांत सुरू होणार होता आणि त्याच वेळी त्याला मांजा या चित्रपटाविषयी सांगण्यात आले होते. या चित्रपटाची पटकथा ऐकल्यावर तो या चित्रपटाच्या कथेच्या प्रेमात पडला होता. पण वेळ नसल्याने त्याने या चित्रपटासाठी नकार देण्याचा विचार केला होता. मात्र अचानक त्याचे ते प्रोजेक्ट रद्द झाले आणि तो मांजा या चित्रपटाचा भाग बनला. त्याने या चित्रपटाच्या आधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकेत काम करणे आणि चित्रपटांमध्ये काम करणे यात खूप फरक असल्याचे त्याला मांजा या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी जाणवले होते. रेडिओ सिटी सिने अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम नवोदित अभिनेता (मांजा), सर्वोत्तम अभिनेता (मांजा) इतकाच नव्हे तर सर्वोत्तम खलनायक (मांजा) अशी तीन नामांकनं त्याला मिळाली आहेत. तीन नामांकने मिळाल्याबद्दल सुमेध प्रचंड आनंदित आहे. याविषयी तो सांगतो "आपलं कोणी कौतुक केल्यावर खूप छान वाटते. त्यात नामांकन मिळाल्यावर जणू कामाची पोचपावती मिळाली असे वाटते. आतापर्यंतचा माझा प्रवास खूप चांगला झाला आहे. सध्या तर मी काहीतरी नवीन आणि वेगळ्या प्रकारे काम करतोय आणि प्रेक्षकांना ते आवडेल अशी मला आशा आहे".