Join us  

सहभाग द्या; नाही दिलात तरी नाराजी नाही बरं का... सुबोध भावेचे भावूक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 3:27 PM

गरजूंच्या मदतीसाठी समोर या, असे आवाहन अभिनेता सुबोध भावे याने आता केलेय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अख्खा देश ठप्प झाला आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीही ठप्प आहे. सर्वच मालिका व चित्रपटांचे शूटींग बंद आहे. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. अशात स्टार्स लोकांचे निभवणारे आहे. पण मनोरंजन उद्योगाशी संबंधित हजारो हात सध्या रिकामे आहेत. बँकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेक अप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ असा अनेकांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा गरजूंच्या मदतीसाठी समोर या, असे आवाहन अभिनेता सुबोध भावे याने आता केलेय.

 बँकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेक अप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ इत्यादी....  अशांना आपण काही दिवस पुरेल इतका शिधा आणि औषधं वगैरे इतर खचार्साठी रोख रुपये १००० अशी मदत करण्याचे ठरवले आहे. आपण शक्य होईल तितका आपला सहभाग द्या, असे आवाहन सुबोध भावे यांनी मराठीतील तमाम कलाकारांना केले आहे. विशेष म्हणजे, नाही दिलात तरी नाराजी नाही बरं का? असेही त्याने म्हटले आहे.

सुबोध लिहितो,

नमस्कार, कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आलंय. प्रत्येकजण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधतोय. लवकरच बाहेर पडूच. पण आपली मराठी कलाकार म्हणून वाटचाल सुरु असताना ह्या प्रवासात ज्यांनी पाणी आणून दिलं, जेवण वाढलं, चेह?्याला लागलेला रंग जपायला मदत केली, कपडे इस्त्री केले, सेटवर खिळे ठोकले, नाटकाची प्रॉपर्टी सांभाळली...थोडक्यात ज्यांचं त्यादिवशीच्या पैशांवर/पाकिटावर पोट भरत होतं, अशांना आपण मदतीचा हात द्यायचं ठरवलं आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेल्या कलाकारांनी ह्या आपत्तीतही गरजवंताला हात द्यायचं ठरवलंय. तेव्हा जशी यथाशक्ती मदत केलीत (काहींना व्यस्त असल्याने इच्छा असूनही करता आली नाही. आता करता येईल.) अशा सगळ्या मराठी कलाकारांना पुन्हा एक आवाहन करतो आहोत. बँकस्टेज आर्टिस्ट, प्रॉपर्टी बॉइज, मेक अप सहाय्यक, ड्रेसबॉय, स्पॉट बॉइज, सेटिंग बॉइज, तंत्रज्ञ इत्यादी....  अशांना आपण काही दिवस पुरेल इतका शिधा आणि औषधं वगैरे इतर खचार्साठी रोख रुपये १००० अशी मदत करण्याचे ठरवले आहे. आपण शक्य होईल तितका आपला सहभाग द्या. (नाही दिलात तरी नाराजी नाही बरं का.)

मदतीसाठी संपर्क

रंगमंच कामगार संघ.कार्पोरेशन बँक, शिवाजी पार्क शाखा.खाते क्र. 520101006246016.IFSC कोड CORP0000057.

#कलाकार फॉरमहाराष्ट्र  सुबोध भावे, रत्नकांत जगताप,सुशांत शेलार, विनोद सातव, प्रवीण तरडे, रमेश परदेशी, शिवाजी शिंदे, राजेश देशपांडे, विजू माने आणि सगळे मराठी कलाकार.संपर्क: ९८२०१४७६०१.

टॅग्स :सुबोध भावे कोरोना वायरस बातम्या