रवी जाधवच्या आॅफीसमध्ये स्ट्रगलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 12:45 IST
सध्या वेबसीरीजची खूप चलती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अमेय-निपुणच्या कास्टिंग काऊचबरोबर स्ट्रगलर्स साला या वेबसीरीजची देखील चर्चा आहे. या वेबसीरीजमध्ये हे स्ट्रगलर आहेत ते संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके. हे दोन्ही स्ट्रगरल आता, पोहोचले आहे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आॅफीसमध्ये.
रवी जाधवच्या आॅफीसमध्ये स्ट्रगलर
सध्या वेबसीरीजची खूप चलती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अमेय-निपुणच्या कास्टिंग काऊचबरोबर स्ट्रगलर्स साला या वेबसीरीजची देखील चर्चा आहे. या वेबसीरीजमध्ये हे स्ट्रगलर आहेत ते संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके. हे दोन्ही स्ट्रगरल आता, पोहोचले आहे दिग्दर्शक रवी जाधव यांच्या आॅफीसमध्ये. त्यामुळे या ठिकाणी जे घडलं आहे ते खरचं खूप मजेशीर आहे. कारण या वेब एपिसोडमध्ये हे दोन स्ट्रगलर्स आपलं नशीब आजमावयाला दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडे आले आहेत. स्ट्रगल्सचा त्यांच्यावर एवढा परिणाम झालाय की समोर आलेली व्यक्ती कोण आहे, याचा देखील अंदाज त्यांना नसतो. मेघना जाधव ही रवी जाधवची बायको आहे हे पण त्या दोघांना माहित नसते. यादरम्यान त्या दोघांच्या बाबतीत जे घडतं ते पाहण्यासारखं आहे.हा स्ट्रगलर साला या वेब सिरीजचा ५ वा वेब एपिसोड प्रदर्शित झाला आहे.