Join us  

कोणत्याही परिस्थितीत स्वतःबरोबर उभे रहा..अभिनेत्री दिपाली सय्यदची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 4:27 PM

अभिनेत्री दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

आपल्या डान्सच्या कौशल्यानं सा-यांची मनं जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री दिपाली सैय्यद सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात ती असते. दिपाली सैय्यद आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.दिपालीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे यात दिपाली लिहिते, कोणत्याही परिस्थितीत स्वतःबरोबर उभे रहा. पोपटी रंगाच्या साडीतले फोटो शेअर करताना दिपालीने तिच्या फोटोला हे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दिपालीचे हे कॅप्शन तिच्या चाहत्यांना भावलं आहे. दिपालीच्या फोटोवर कमेंट देताना एका चाहत्याने लिहिले, परिस्थिती नावाची शाळा माणसाला आयुष्यात योग्य शिक्षण देते...

अभिनेत्री दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे. दिपाली सय्यदचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला. बंदिनी, समांतर या तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या मालिका आहेत. दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखल्या जाते. मात्र खऱ्या अर्थाने ओळख जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यातून तिला मिळाली. दीपाली सय्यदच्या डान्सचे देखील लाखो चाहते आहेत... आतापर्यंत अनेक डान्स रिआलिटी शोज मध्ये दीपाली परिक्षक म्हणून दिसलीये.. अभिनयाबरोबरच दीपालीला एक उत्तम डान्सर देखील आहे..दिपालीने करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात त्यांनी काम केले.

दिपाली सैय्यद सामाजिक कार्यक्रमांमध्ये फारच सक्रिय असते. अभिनयाशिवाय तिने राजकारणातीह प्रवेश केला. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य ती करत असते. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांत दिपालीने निस्वार्थ नागरिकांची सेवा केली आहे.

टॅग्स :दीपाली सय्यद