Join us  

अलका कुबल यांच्या उपस्थितीत श्री स्वामी चरित्र सारामृताचा प्रकाशन सोहळा संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 4:35 PM

या संपूर्ण २१ अध्याय कथास्वरूपात असलेल्या ध्वनिमुद्रिकाचे निवेदन अभिनेत्री अलका कुबल आठल्ये व डॉ. किशु पाल यांनी केले आहे.

"भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " हे वाक्य कानावर पडले तरी स्वामी भक्तांना, संकटात सापडलेल्या व्यक्तीला एक दिलासा मिळतो, कि स्वामी आपल्या पाठीशी आहेत, याचा त्याला आधार मिळतो. श्री स्वामीची महती काय वर्णावी, भक्तांना यांचे अनुभव आलेले असतातच. श्री दत्तगुरुंचे श्री श्रीपाद वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज, नवनाथ हे अवतार आहेत. या सद्गुरूंच्या महती आपण किर्तन, पोथी, सिडी यामधून आपण ऐकत आलोय अन् वाचनातही आली आहे. असंच एक संपूर्ण स्वामी चरित्र २१ अध्यायात डॉ. किशु पाल यांनी गुढी पाडवा या मराठी नववर्षाच्या निमित्ताने " श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत " कथास्वरूपात. ही ध्वनिमुद्रिका स्वामी भक्तां साठी आणित आहेत. या ध्वनीमुद्रीकाचे प्रकाशन सौ. मनिषा रविंद्र वायकर, डॉ. किशु पाल, मैथिली जावकर, लेखक प्रकाश कामत, कॅमेरामन समीर आठल्ये, सुप्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आठल्ये आणि मोजक्याच स्वामी भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.                       

डॉ. किशु पाल या स्वामी भक्त. स्वामींच्या सेवेत असतानां त्यांनी नृत्यामध्ये पीएचडी केली आहे. तंजावूर घराण्याचे पं. वेणुगोपाल पिल्लै यांच्याकडुन भरतनाट्यम व हैदराबाद येथील डॉ. वेंकटेश्वर राव यांच्याकडुन कुचिपुडी या नृत्यांची दिक्षा घेतल्यानंतर त्यांनी नृत्यालिका प्रतिष्ठानची स्थापना केली, आता या नृत्यालिकाच्या मुंबई, पुणे, नाशिक आदि भारतात व परदेशात एकूण ३६ शाखा प्रस्थापित आहेत. डॉ. किशु पाल यांना मेनका उर्वशी या चित्रपटाचे सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शिका म्हणून झी मराठी अॅवाॅर्ड मध्ये सन्मानित करण्यात आले. या अगोदर त्यांनी बऱ्याच चित्रपटांना नृत्यदिग्दर्शन केले आहे. मराठी तारका या गाजलेल्या कार्यक्रमाचेही त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. श्री स्वामी चरित्र  सारामृत ची संकल्पना डॉ. किशु पाल यांची असून कथालेखन प्रकाश कामत यांच्या आहे. या संपूर्ण २१ अध्याय कथास्वरूपात असलेल्या ध्वनिमुद्रिकाचे निवेदन अभिनेत्री अलका कुबल आठल्ये व डॉ. किशु पाल यांनी केले आहे. आपण दिलेली ही नववर्षाची  अनमोल भेट स्वामी भक्तांना नक्कीच आवडेल अशी खात्री डॉ.  किशु पाल यांना वाटते. 

टॅग्स :अलका कुबल