भुषणचा भुतकाळ लवकरच उलगडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2016 14:18 IST
होय.. भुषण प्रधानचा भुतकाळ आता लवकरच सर्वांच्या समोर येणार आहे. भुषणच्या भुतकाळात ...
भुषणचा भुतकाळ लवकरच उलगडणार
होय.. भुषण प्रधानचा भुतकाळ आता लवकरच सर्वांच्या समोर येणार आहे. भुषणच्या भुतकाळात अशा काय गोष्टी घडल्यात हेजाणुन घ्यायला त्याचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील परंतू त्याचा भुतकाळ उलगडणार आहे तो मोठ्या पडद्यावर. हा भुतकाळ म्हणजे त्याचा आगामी चित्रपट आहे. मराठी सिनेमांमध्ये आपल्याला हॉरर विषय जास्त पहायला मिळत नाहीत. अशा विषयांवरचे सिनेमे पहायला प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतात आता भुषण प्रधान अन हेमांगी कवी या नव्या जोडीचा भुतकाळ हा हॉरर सिनेमा प्रेक्षकांना किती अपील होतोय ते आपल्याला भविष्यातच समजेल. सीएनएक्सशी भुषणने त्याच्या या आगामी चित्रपटाविषयी मनमोकळ््या गप्पा मारल्या अन सांगितले की, कॉलेजमध्ये जाणारा एक तरुण मुलगा ज्याचा भुतावर बिलकुल विश्वास नसतो. तो त्याच्या फ्रेन्ड्स सोबत गावातील वाड्यावर जातो जो वाडा हॉन्टेड आहे असे बोलले जाते. त्या वाड्याला बदलण्यासाठी गावात गेलेल्या या तरुणाला पुढे कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो अशी कथा या सिनेमाची आहे. रोमँटिक गाणी, कोकणचा नजारा आपल्याला या सिनेमात पहायला मिळणार असुन लवकरच चित्रपट प्रदर्शित होईल असे भुषणने सांगितले आहे.