प्रियांकाचे प्रेक्षकांसाठी खास दिवाळी गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 13:35 IST
मराठी कलाकारांनीदेखील खास आपल्या चाहत्यांसाठी पाारंपारिक लूकमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देत असल्याचे दिसत आहे. आता, मराठी कलाकारांमध्ये आणखी एक नाव आर्वुजुन घ्यावे लागणार आहे. हे नाव म्हणजे बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा.
प्रियांकाचे प्रेक्षकांसाठी खास दिवाळी गिफ्ट
दिवाळी हा सण मोठया धुमधडाक्यात साजरा केला जातो. प्रत्येकजण काही दिवसांपासून फेसबुक, व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम अशा अनेक माध्यमातून सोशल मिडीयावर दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात. त्यामध्ये आपले लाडके कलाकार तरी कसे मागे राहतील. मराठी कलाकारदेखील खास आपल्या चाहत्यांसाठी पाारंपारिक लूकमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देत असल्याचे दिसत आहे. आता, मराठी कलाकारांमध्ये आणखी एक नाव आर्वुजुन घ्यावे लागणार आहे. हे नाव म्हणजे बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा. हो, कारण प्रियांकाने व्हेटिंलेटर या चित्रपटाची निर्मिती करून मराठी इंडस्ट्रीमध्ये पदापर्ण केले आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश मापुसकर यांनी केले आहे. यापूर्वी राजेश मापुसकर याने फरारी की सवारी हा चित्रपट केला होता. तसेच या चित्रपटात एका सीनसाठी प्रियांकादेखील असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर या चित्रपटात प्रेक्षकांना ११६ मराठी कलाकारदेखील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात आशुतोष गोवारीकर मुख्या भुमिकेत असणार आहे. तर जितेंद्र जोशी, राहुल सोलापुरकर, उषा नाडकर्णी, सुकन्या कुलकर्णी अशा अनेक कलाकारांचा समावेशदेखील आहे. नुकतेच प्रियांकाने दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकाने चक्क मराठीमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच माझ्या खास प्रेक्षकांसाठी व्हेटिंलेटर हा चित्रपट दिवाळी गिफ्ट असल्याचेदेखील तिने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. अशा प्रकारे बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियांका चोप्राने हिने खास आपल्या मराठी शैलीत प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.