Join us

'गुलाबजाम'चा टीझर प्रदर्शित,या अंदाजात दिसले सोनाली कुलकर्णी-सिद्धार्थ चांदेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 15:01 IST

टीझरमध्ये सोनाली पाककले विषयी माहिती देतांना टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

सिनेमातून कायम चाकोरीबाहेरचे विषय हाताळणारा दिग्दर्शक सचिन कुंडलकरचा एक हटके प्रयोग असलेला आगामी मराठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.मुळात सिनेमा 'गुलाबजाम'ची घोषणा झाल्यापासूनच सिनेमाची अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे.नुकतेच गुलाबजामूनचा टीझर रिलीज झाला आहे.सिनेमात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.चित्रपटाच्या टीझरवरुन यात सोनाली आणि सिद्धार्थ हे दोघे शेफच्या भूमिकेत आहेत असे समजते.टीझरमध्ये सोनाली पाककले विषयी माहिती देतांना टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.सध्या मराठीत वेगवेगळे प्रयोग होत आहेत.त्यानुसार थाटकुडम ब्रिज या म्युझिक बँडचे म्युझिक सिनेमात ऐकायला मिळणार आहे.'वजनदार' सिनेमात सचिन कुंदलकरने सई ताम्हणकर आणि प्रिया बापट या अभिनेत्रींना घेऊन सिनेमात वेगवेगळे प्रयोग केले होते.रसिकांकडूनही 'वजनदार' सिनेमाचे खूप कौतुक करण्यात आले होते.त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सचिन कुंडलकर त्याच्या आगामी सिनेमात रसिकांना देणारा 'गुलाबजाम' नक्कीच मनोरंजनाचा बार उडवून देणारा ठरणार आहे हे मात्र नक्की. पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून सोनाली कुलकर्णी आणि सिध्दार्थ चांदेकर ही जोडी रोमँटीक भूमिकेत पाहायला मिळू शकते असे कळतंय.‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणा-या भारतीय माणसाची गोष्ट आहे.मराठी पारंपारिक खाद्यपदार्थ शिकण्यासाठी आदित्य म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर भारतात येतो आणि पुण्यात आदित्यची भेट राधा अर्थात सोनाली कुलकर्णीशी होते.राधा त्याला तिची कला आणि भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थाची टेकनिक शिकवण्याचा निर्णय घेते.यानंतर राधा आणि आदित्यच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते.मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते,त्यात कशी वळणे येतात हे सर्व सांगणारी सुंदर कथा म्हणजे 'गुलाबजाम' हा सिनेमा आहे.काही दिवसांपूर्वीच गुलाबजामून नावाच्या हिंदी सिनेमाची घोषणा दिग्दर्शक अनुराग कश्यपने केली होती.विशेष म्हणजे या सिनेमात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघांच्याही मुख्य भूमिका असून रोमँटीक कॉमेडी सिनेमा असल्याचे अनुराग कश्यपने सांगितले होते. त्याच पाठोपाठ आता रसिकांना मराठीत 'गुलाबजाम' पाहण्याची संधी मिळणार आहे.