Join us  

सोनाली कुलकर्णीने शेअर केला स्टनिंग फोटो, म्हणतेय - अब कुछ अलग कोरोना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 12:11 PM

सोनाली कुलकर्णीच्या या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे

जगभरातील जवळपास सर्वच देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. रविवारी सकाळी 6 लाख 63 हजार 541 जणांना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. तर 30, 873 लोकांचा मृत्यू झाला आहे. यादमरम्यान 1 लाख 42 हजार 175 रुग्ण ठीक झाले आहेत. युरोपात मृतांचा आकडा 20 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. अशांमध्ये सर्वत्रच पूर्णपणे लॉक डाउन करण्यात आले आहे. त्यामुळे सामान्यांसोबत सेलिब्रेटीदेखील घरात आहेत. भलेही सेलिब्रेटी शूटिंग वगैरे करत नसले तरी सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात आहेत.

सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असून ती नेहमी फोटो शेअर करत असते. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले की, सुंदर डोळे चमकत आहेत. या आठवड्यात मी शेअर करतोय माझा ट्रान्सफॉर्मेशन पिक्चर. बस बहुत हुआ, अब कुछ अलग कोरोना.

तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. 'ती पाहता हसीन बाला, कलेजा खलास झाला या ओळी ही आपुसकच तोंडावर येतील असा हा सोनालीचा लूक सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. नेहमी प्रमाणे सोनालीच्या चाहत्यांनी या फोटोंवर आपल्या कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. त्यामुळे सध्या सोनाली सोशल मीडियावर आपल्या स्टाइलचा जलवा दाखवत सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे.

सोनाली कुलकर्णी हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. शेवटची ती हिरकणी चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती. सध्या ती झी युवा वाहिनीवरील डान्सिंग क्वीन या डान्सिंग रिएलिटी शोचं परीक्षण करत आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी