Join us  

‘रियल लाईफ शादी अभी बाकी हैं’ सोनाली कुलकर्णीने शेअर केले 'ते' फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 10:49 AM

गेल्या वर्षी सोनाली आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा झाला आहे.

सोनाली कुलकर्णी आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोनाली तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

आणि चाहत्यांशी संवाद साधत असते. यावेळी सोनालीने तिचे थ्रो बॅक फोटो पोस्ट करत. त्याला शादी अभी बाकी आहे असे कॅप्शन दिले आहे. साडीतले हे फोटो सोनालीचे सिनेमाच्या सेटवरचे आहेत. 

गेल्या वर्षी सोनाली आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा झाला आहे. यावर्षी सोनाली कुणालसोबत लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जातेय. सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे.

सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब सोनाली हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तिने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. लवकरच ती थ्री चिअर्स टू'सिनेमामध्ये हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरसोबत दिसणार आहे . लोकेश विजय गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

टॅग्स :सोनाली कुलकर्णी