सोनाली कुलकर्णी पोस्टर बॉईजमध्ये दिसणार या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 14:50 IST
सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटांप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्ये देखील अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. दिल चाहता है, मिशन काश्मीर या चित्रपटातील ...
सोनाली कुलकर्णी पोस्टर बॉईजमध्ये दिसणार या भूमिकेत
सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटांप्रमाणे हिंदी चित्रपटांमध्ये देखील अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. दिल चाहता है, मिशन काश्मीर या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. सिंघम या हिंदी चित्रपटात देखील ती झळकली होती. पण २०१३ नंतर तिने हिंदी चित्रपटात काम केले नाही. तिने दरम्यानच्या काळात देऊळ, डॉ. प्रकाश बाबा आमटे, अगं बाई अरेच्चा २ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले. आता ती पुन्हा एकदा हिंदी चित्रपटामध्ये झळकणार आहे. पोस्टर बॉईज या चित्रपटात ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तिचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सनी देओल आणि बॉबी देओल एकत्र काम करणार आहेत.पोस्टर बॉईज या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सोनाली आणि सनी यांची चांगलीच गट्टी जमली होती. त्या दोघांची पोस्टर बॉईजच्या आधीपासूनच खूप चांगली बाँडिंग आहे. कारण मॅन या चित्रपटात सोनाली आणि सनी एकत्र काम करत होते. या चित्रपटासाठी त्यांनी चित्रीकरण देखील केले होते. पण काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे पोस्टर बॉईज या चित्रपटाचा विषय आला, त्यावेळी सनीनेच श्रेयस तळपदेला सोनालीचे नाव सुचवले. या भूमिकेसाठी सोनालीच योग्य असल्याचे सनीला वाटत होते. सोनाली सनीसोबत काम करायला खूपच उत्सुक होती. चित्रीकरणादरम्यान तो माणूस म्हणून कसा आहे हे तिला जाणून घ्यायला मिळाले. सोनालीच्या मते सनी एक माणूस म्हणूनही खूप चांगला आहे.Also Read : सोनाली कुलकर्णीने शेअर केले दिल चाहता हैच्या वेळेचे सिक्रेट्स