Join us  

लॉकडाऊनमध्ये स्मिता गोंदकरने शेअर केला ग्लॅमरस फोटो, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 5:13 PM

सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते.

'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले. 'पप्पी दे पारुला' म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अ‍ॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. स्मिताने नुकताच सोशल मीडियावर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. फोटोत स्मिता खूपच ग्लॅमसर दिसते आहे. तिच्या फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

स्मिताला नेहमी वेगवेगळ्या भूमिका व गोष्टी करायला आवडतात.कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करत नवनवीन गोष्टी करायला पाहिजेत. माझे तर हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न सत्यात पूर्ण करणार आहे.

टॅग्स :स्मिता गोंदकर