Join us

​ मृण्मयीच्या लग्नात सिता-यांची धमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 19:12 IST

 अभिनेत्री मृण्मयी देशपांडे देखील नुकतीच स्वप्निल राव सोबत विवाहबंधनात अडकली आहे. मृण्मयीच्या लग्नातील आणि रिसेप्शनचे काही फोटोज सध्या व्हायरल ...

 अभिनेत्री मृण्मयी देशपांडे देखील नुकतीच स्वप्निल राव सोबत विवाहबंधनात अडकली आहे. मृण्मयीच्या लग्नातील आणि रिसेप्शनचे काही फोटोज सध्या व्हायरल झाले आहेत. मृण्मयीच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक सिताºयांनी धमाल केली आहे. मेहंदी, संगीत, हळद आणि रिसेप्शन अशा अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहून कलाकारांनी कल्ला केला. सिदधार्थ चांदेकर, पूजा सावंत, शंकर महादेवन, पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले, भुषण प्रधान, अशा कितीतरी सेलिब्रिटीजनी मृण्मयीच्या लग्नाला चारचाँद लावले.       मृण्मयी सोबतचे अनेक झक्कास फोटो देखील कलाकारांनी शेअर केले आहेत.  नव वधुच्या वेषात सजलेली नवी नवरी मृण्मयी लग्नात अतिशय सुंदर दिसत होती. मृण्मयीच्या मेहंदी, संगीत आणि रिसेप्शन सोहळ््याचे  फोटो देखील फेसबूकवर व्हायरल झाले आहेत. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सनई चौघड्यांचे मंगलमय सुरु घुमु लागले आहेत. कारण एका पाठोपाठ एक असे अनेक कलाकार या महिन्यात विवाहबदध झाले आहेत. मेहंदी. संगीत, हळद ते लग्नाच्या मंडपातील या नव विवाहीत जोडप्यांचे सर्वच फोटो सध्या चर्चेचा विषय झाले आहेत. सोशल साईट्सवर सगळीकडेच लग्नाचा धुमधडाका पहायला मिळत आहे. चिराग पाटील,श्रृती मराठे, पल्लवी पाटील, मयुरी देशपांडे, यांच्या पंक्तीत आता लवकरच मयुरी वाघचा देखील समावेश होणार आहे. मयुरी पुढील वर्षी लग्न करणार असल्याचे कळतेय. आता या नंतर कोणत्या कलाकाराचे शुभमंगल होणार आहे हे तर लवकरच समजेल. तो पर्यंत आपणही मराठी चित्रपटसृष्टीतील या सिताºयांचे लग्नसोहळे एंजॉय करुयात.