सोशल मीडियावरही रिंकू झाली ‘सैराट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 14:29 IST
‘सैराट’ चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेने रिंकूने सर्वांनाच याड लावलंय. तिच्या अभिनयाचे कौतुक सर्व स्तरावरून होत असताना सोशल मीडियावरदेखील ती झळकत ...
सोशल मीडियावरही रिंकू झाली ‘सैराट’
‘सैराट’ चित्रपटातील आर्चीच्या भूमिकेने रिंकूने सर्वांनाच याड लावलंय. तिच्या अभिनयाचे कौतुक सर्व स्तरावरून होत असताना सोशल मीडियावरदेखील ती झळकत आहे. रिंकू राजगुरु हिने शुक्रवारी आपला वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियातून तिच्यावर अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव करणत आला. सैराट चित्रपटानंतर रिंकूच्या फॅनच्या संख्येत जबरदस्त वाढ झालीये. रिंकूच्या फेसबुकवरील आॅफिशियल पेजसोबतच तिच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या अनेक फेक अकाउंटवरही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या.सैराट चित्रपटाला सध्या जबरदस्त यश मिळतेय. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळवलेय. या चित्रपटातील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय.