Join us

सिमाची बॉलीवूड मध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 15:29 IST

कॅरी आॅन देशपांडे या चित्रपटातुन मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी सिमा कदम लवकरच बॉलीवूड मध्ये एन्ट्री करणार आहे. नुकतेच ...

कॅरी आॅन देशपांडे या चित्रपटातुन मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण करणारी सिमा कदम लवकरच बॉलीवूड मध्ये एन्ट्री करणार आहे. नुकतेच तिने गोवींद सकारीया यांचा राम भाई चित्रपट साईन केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गोवींद सकारीया करणार असुन सहनिर्मात्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली आहे. चित्रपटाचे संगीत बप्पी लहरी यांनी केले आहे.चित्रपटामध्ये सीमा सोबत शरमन जोशी, नायरा बॅनर्जी सुध्दा असणार आहेत. चित्रपटाचे लेखन इश्क, राजा शोला और शबनम चे लेखक प्रफुल्ल पारेख यांनी  केल आहे. या चित्रपटामध्ये ती एका मॉडर्न मुलीची भुमिका साकारणार आहे. याच बरोबर तिचा लवकरच यारकड नावाचा तामीळ चित्रपट रिलीज होणार आहे. तसेच मनींदर भट्ट यांच्या सोबत एक पंजाबी अल्बम प्रसिद्ध होणार आहे.