Join us  

प्रीतम या चित्रपटाद्वारे हा मल्याळम इंडस्ट्रीतील दिग्गज वळणार मराठीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 2:28 PM

सिजो रॉकी हे प्रीतम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नव्या धाटणीची एक सुंदर प्रेमकथा प्रीतमच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

मराठी चित्रपटांचा ट्रेंड सध्या बदलतोय. मराठी चित्रपटांमधली वाढती प्रयोगशीलता आणि त्याला प्रेक्षकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे बॉलिवूडसह अनेक प्रादेशिक कलावंतांनाही मराठी चित्रपटसृष्टीने कायमच खुणावलं. पण आता तेवढ्यावरच न थांबता, मल्याळम सिनेसृष्टीतलं एक मोठं नाव मराठीत पदार्पण करतंय. 

विझार्ड प्रोडक्शनच्या माध्यमातून दिग्दर्शक सिजो रॉकी हे प्रीतम हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नव्या धाटणीची एक सुंदर प्रेमकथा प्रीतमच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.   

सिजो रॉकी आणि विझार्ड प्रोडक्शन मल्याळम इंडस्ट्री मध्ये सर्वश्रुत आहेत, पण त्याचसोबत निर्मिती आणि जाहिरात क्षेत्रातही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. अनेक लघुपटांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग आहे. मल्याळम इंडस्ट्रीत मिळालेल्या यशानंतर आता ते मराठी इंडस्ट्रीकडे वळले आहेत.

विझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत प्रीतम या चित्रपटाचे दिग्दर्शन सिजो रॉकी करीत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी हे दोघेही खूप उत्सुक आहेत. “मराठी चित्रपट हा आशयसंपन्न असतो, त्यामध्ये खूप विविधता असते. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय याचा आम्हाला आनंद आहे”, असे सिजो रॉकी यांनी सांगितले. चित्रपटाची निर्मिती फैझल निथिन सिजो करत आहेत.

प्रीतम या चित्रपटाचे संवाद आणि पटकथा गणेश पंडित यांची असून चित्रपटाची गीतं गुरू ठाकूर यांनी लिहिली आहेत. चित्रपटाचे कला दिग्दर्शन संदीप रावडे करणार असून संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाश तर संगीत विश्वजीथ यांचे आहे. जयकुमार नायर आणि रफिक टी.एम. चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. गणेश दिवेकर हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. विझार्ड प्रोडक्शन प्रस्तुत आणि सिजो रॉकी दिग्दर्शित प्रीतम या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच कोकणात सुरुवात होणार आहे. या चित्रपटात कोण कलाकार मुख्य भूमिकेत असणार याविषयी चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. या चित्रपटाच्या कलाकारांची घोषणा लवकरच केली जाणार असल्याची चर्चा आहे.    

टॅग्स :प्रीतम